नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने नंदुरबार जिल्हा कुस्तीगीर संघटना कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन दि.१५ ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, नंदुरबार येथे दि.१५ ऑक्टोबर रविवार रोजी सकाळी ९ वाजता पैलवान वजन गट निश्चित होईल. त्यानंतर मॅट व मातीवरील कुस्तीचे उद्घाटन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सायंकाळी ४ वाजता होईल. यावेळी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पैलवानांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.शिरीष चौधरी तसेच सचिव विजय मराठे यांनी केले आहे.
स्पर्धेसाठी वजन गट पुढील प्रमाणे ः माती विभाग / गादी विभाग – ५७ किलो, ६१ किलो, ६५ किलो, ७४ किलो, ७९ किलो, ८६ किलो, ९२ किलो, १२५ किलो पर्यंत वजन गट असतील. स्पर्धेत निवडून येणार्या खेळाडूंनी आधारकार्ड, २ पासपोर्ट फोटो, पूर्ण नाव व पत्ता, मोबाईल नंबर आवश्यक आहे. स्पर्धेत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे नियम व अटीशर्ती लागू राहतील.








