Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तांबेबारा धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, शनिमांडळ, तिलाली, तलवाडे ग्रामस्थांची मागणी

team by team
October 7, 2023
in राजकीय
0
तांबेबारा धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, शनिमांडळ, तिलाली, तलवाडे ग्रामस्थांची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

ब्रिटीशकालीन तांबेबारा धरण व दडचा तलावाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे, अशी मागणी तिलाली, तलवाडे व शनिमांडळ ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. तसे निवेदन आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत तसेच जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना देण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदूरबार तालुक्यातील तिलाली, शनिमांडळ, तलवाडे खुर्द या तिन्ही गावाचा सार्वजनिक पाणी पुरवठ्याचे स्त्रोत हे ब्रिटीशकालीन तांबेबारा व दडचा तलाव आहे. परंतू या दोघा धरणावर शेतकर्‍यांनी अनधिकृत जलपरी ठेवून शेतीसाठी पाणी उपसा करीत आहेत. यामुळे या धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. परिणामी वरील तिघी गावांना आतापासून पिण्याची पाण्याची टंचाई भासू लागली आहे.

भविष्यात तीव्र पाणी टंचाईला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागू नये व त्यातून होणार्‍या भानगडी उद्भवू नये म्हणून या धरणाचा पाणीसाठा आरक्षित करावा असा ठराव देखील ग्रामपंचायतींनी केला आहे. आता प्रशासनाने सदर पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा, अशी मागणी जि.प.सदस्या जागृती मोरे, माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील, तिलाली सरपंच स्मिता पाटील, शनिमांडळ सरपंच संतोष पाटील, सदस्य जगन्नाथ पाटील, दीपक पाटील, संभाजी माळी, ताराबाई राजपूत, लाला भिल, योगेश मोरे, डॉ.भावराव पाटील, छायाबाई पवार, राजेंद्र माळी, ठाणसिंग राजपूत आदींनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रौप्य महोत्सव, जनजाती दिवसाच्या औचित्याने जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन :आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

एस.ए.मिशन हायस्कूल येथे वन्यजीव सप्ताह साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add