नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा प्रोफेशनल फोटोग्राफर असोसिएशन आणि सतरंग यशपवन डिजिटल प्रेस सुरत तसेच फुजीफिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्ह्यातील छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शहरातील इंदिरा मंगल कार्यालय सभागृहात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेचेे उद्घाटन जिग्नेश पटेल यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सुरत येथील केतन मेहता, सादाम आलम,
युवराज वसावा, आशिषभाई उपस्थित होते. एक दिवसीय कार्यशाळेसाठी म्हसावद येथील अनिल कुवर यांनी भव्य एलईडी स्क्रीन उपलब्ध करून दिली. मान्यवरांचे स्वागत फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल निकुंभे, उपाध्यक्ष गणेश पारेख, माजी अध्यक्ष संदीप महाजन, राकेश तांबोळी यांनी केले. या एकदिवसीयय कार्यशाळेत फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग क्षेत्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. छायाचित्रकार पंकज सोनवणे आणि सौ. प्रणिता सोनवणे या नवदांपत्यांनी व्यासपीठावर वधू-वरांच्या वेशभूषेत सादरीकरण केले.
व्हिडिओ एडिटर जिग्नेश पटेल यांनी छोट्या छोट्या प्रसंगातून चित्रीकरण करता येते. याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.तसेच ग्रामीण भागातील प्रसंगांवर आधारित लघु चित्रपटांचे सादरीकरण केले. संपूर्ण कार्यशाळेचे प्रभावी सूत्रसंचालन फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महादू हिरणवाळे यांनी केले.
कार्यशाळेचे संयोजन प्रफुल निकुंभे, राकेश तांबोळी, संदीप महाजन, सागर बारी, भूषण पाठक, वैभव थोरात, पियुष सोनार,गणेश चौधरी,भिमराज बागले,कांतीलाल जावरे,विकी चौधरी आणि पदाधिकाऱ्यांनी केले. एक दिवसीय कार्यशाळेस नंदुरबार शहरासह जिल्ह्यातून शंभरावर छायाचित्रकारांनी उपस्थित राहून प्रतिसाद दिला.








