नंदूरबार l प्रतिनिधी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार व्दारा आयोजित व वर्ल्ड ऑफ स्पोर्टस् शिक्षण, सांस्कृतिक संस्था, नाशिक यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय जलतरण व डायव्हींग स्पर्धेचे आयोजन दि.26 ते 27 सप्टेंबर 2023 या कालावधीत नंदुरबार नगर परिषदेचे स्व. बाळासाहेब जलतरण तलाव, नंदुरबार येथे करण्यात आलेले होते.
सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन दि.26 सप्टेंबर 2023 रोजी नंदुरबार नगर परिषद, मुख्याधिकारी, अमोल बागुल यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक दिपक दिघे, वर्ल्ड ऑफ स्पोर्टस् शिक्षण, सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र निंबायते, क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी, व क्रीडा शिक्षक दिनेश बैसाणे, जगदिश बच्छाव, महेंद्र फटकाळ, जगदिश वंजारी, संदीप पाटील,
शिवाजी पाटील हे उपस्थित होते. सदर जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथमच विविध प्रकारात 45 खेळाडूंनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे पंच म्हणुन निनाद निंबायते, राहुल काळे, अमोल भोयर, संजय राजपूत, रंजित गावित, अमित गावीत, करण पाडवी, दर्शना पाठक यांनी काम पाहिले सुत्रसंचालन राजेंद्र निंबायते यांनी केले व आभार मुकेश बारी यांनी मानले.








