नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरात अग्निशमन केंद्रात बंब काढताना कर्मचाऱ्याच्या अंगावरून बंब गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरुद्ध उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
गणेश विसर्जन मिरवणुकांनंतर रस्त्यावर पडलेला गुलाल धुण्यासाठी नंदुरबार अग्निशमन केंद्रातून चालक धाकू जगन्नाथ धनगर हे बंब केंद्रातून बाहेर काढत होते. त्यावेळी अचानक कर्मचारी ईश्वर झुलाल गोसावी (४५, रा. नंदुरबार) यांच्या अंगावरून बंब गेला. त्यात त्यांचे दोन्ही पाय चाकाखाली दाबले गेले.
शिवाय इतरही ठिकाणी दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सदा श्रावण देवरे रा.सीनपाडा ता.साक्री यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलिसांत धाकू धनगर रा.घोटाने, ता.नंदूरबार यांच्याविरुद्ध भादवी 304 (अ), 279,337,338 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोसई माधुरी कंखरे करीत आहेत.








