नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी सोमवार, 4 ऑक्टोबर, 2021 रोजी रवाना करण्यात येणार आहे.
त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद व त्यांअतर्गत असलेल्या अक्कलकुवा, शहादा व नंदुरबार येथील तीनही पंचायत समित्या मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास 4 व 5 ऑक्टोबर, 2021 या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहे.