Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावाला मिळाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा विभाग स्तरावरील पुरस्कार

team by team
September 20, 2023
in राज्य
0
नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावाला मिळाला संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा विभाग स्तरावरील पुरस्कार

नंदुरबार l प्रतिनिधी

संत गाडगेबाबा सामान्य लोकात काम करणारे संत होते. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा जप केला. स्वच्छतेबाबत त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे विभाग स्तरावरील पुरस्काराचे वितरण प्रसंगी कार्यक्रमात केले. या पुरस्कारात नंदुरबार तालुक्यातील श्रीरामपूर गावास विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

 

 

विभाग स्तरावर संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन २०१९-२० या वर्षांसाठी एक व कोरोना कालावधी असल्याने सन २०२० २१ २०२१-२२ या दोन वर्षांची एक राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार स्पर्धा राबविण्यात आली. या स्पर्धेचे पुरस्कार वितरण विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उपायुक्त (विकास) उज्वला कोळसे, सहाय्यक आयुक्त (विकास) मनोज कुमार चौधर उपस्थित होते.

 

 

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्रात सुरु झाले यावरुन देशपातळीवर स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली त्याच बरोबरीने रोजगार हमी योजना आणि इतरही अशा अनेक योजना आहेत, ज्या महाराष्ट्रात सुरु झाल्या आणि आता त्या देशपातळीवर राबविण्यात येत आहेत. तसेच स्वच्छता अभियान हे राज्यात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या संदेशाचे सर्वांनी पालन करावे आणि प्रत्येकाने आपला गाव परिसर शहर स्वच्छ ठेवावे.

 

 

विभागीय आयुक्तांनी सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे धनादेश सम्मान चिन्ह व प्रमाणपत्र वाटप करुन गौरविले. पुरस्कार कार्यक्रमासाठी पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक व संबंधित तालुक्याचे पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा आयुक्त (विकास) मनोज चौधरी यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी देशपांडे व आभार प्रदर्शन अनिल राणे यांनी केले.

 

 

सन २०१९-२० या वर्षाच्या विभागस्तरीय तपासणीमध्ये नाशिक विभागातील पारितोषिकासाठी पात्र ग्रामपंचायती

बातमी शेअर करा
Previous Post

कला-कौशल्यावर गुजराण करणाऱ्यांना देणार पुरक साहित्य : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

16 ऑक्टोबरपर्यंत राबविणार ‘सेवा महिना’ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, दिव्यांग कल्याण अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत  ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियान

16 ऑक्टोबरपर्यंत राबविणार ‘सेवा महिना’ : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add