Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देवू नये, विविध ओबीसी समविचारी संघटनेची मागणी

team by team
September 18, 2023
in राजकीय
0
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देवू नये, विविध ओबीसी समविचारी संघटनेची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिल्यास ओबीसी बांधवाचे प्रचंड नुकसान होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरीता कुणाचाही विरोध नसुन त्यांनी कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करुन ओबीसी च्या वाट्यात हक्क मागु नये. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन राज्यभर आंदोलन पुकारेल. त्यामुळे भविष्यात मोठा संघर्ष उद्भवू शकते. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देवू नये, अशी मागणी विविध समविचारी ओबीसी संघटनांच्यावतीने शासनाकडे करण्यात आली आहे. तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.

निवेदनावर पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाज, कुणबी जातीचे दाखले मिळावे या आंदोलन करीत आहे. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकार ने ७ सप्टेंबर रोजी जी.आर काढुन मराठा समाजाच्या ज्या व्यक्ति जवळ निजामकालीन दाखले आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाण पत्र देण्यात यावे असा जी.आर काढला आहे व या अनुषंगाने आता पर्यंत ६१९ लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचे समजते. मराठा समाजाला कुणबी जाताचे प्रमाण पत्र देण्यात येऊ नये या करीता ओबीसी प्रवर्ग भविष्यात रस्त्यावर उतरून संघर्ष करेल व राज्यव्यापी आंदोलनाने सुरवात करेल.

त्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरीता कुणाचाही विरोध नसुन त्यांनी कुणबी जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करुन ओबीसीच्या वाट्यात हक्क मागु नये. ५२ टक्के ओबीसी ला पहिले २७ टक्के आरक्षण होते त्यात व्हिजेएटी, एसबीसी आणि ईतर असे विभाजन होऊन आता फक्त १९ टक्के आरक्षण ऊरले आहे. मराठा समाजाला प्रमाणपत्र दिल्यास ओबीसी बांधवाचे प्रचंड नुकसान होणार आहे. निवेदनावर मोहन माळी, पंडीत माळी, निंबा माळी, एजाज बागवान, जगन्नाथ माळी, वासुदेव माळी, मधुकर माळी, पितांबर खैरनार, नरेंद्र जाधव, रामकृष्ण मोरे, शरीफ बागवान, चंद्रकांत खेडकर, भगवान कुंभार, एकनाथ कुंभार तसेच समस्त माळी पंच, अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारती महात्मा फुले समता परिषद, महात्मा फुले फाऊंडेशन, ऑल इंडीया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन, भटके विमुक्त हक्क परिषद, ओबीसी संघर्ष समिती आदी संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस प्रशासनाची बॅण्डवर बंदी, गणेश विसर्जनावर बहिष्काराचा गणेश मंडळांचा पवित्रा

Next Post

20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

Next Post
20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

20 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add