Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचा मोठा भाग कोसळला

team by team
September 18, 2023
in राज्य
0
सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचा मोठा भाग कोसळला

नंदूरबार l प्रतिनिधी

धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाला टाकरखेडा गावाच्या दिशेने काल दुपारी मध्यभागीच भगदाड पडले होते.आज सकाळी मोठा भाग कोसळला याचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सारंगखेडा (ता. शहादा) येथील तापी नदीच्या पुलावरून काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्याने टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले. यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या लक्षात ही गोष्ट येताच पुढील अनर्थ टाळण्यासाठी त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, तापी नदीला पूर आल्याने अथांग पाणी वाहत आहे. त्यातच पुलावर भगदाड पडले. पोलिसांना माहिती दिल्यावर देखील पोलीस यंत्रणा तात्काळ पोहचली.

टाकरखेडा येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील वाहतूक थांबवली. सारंगखेडा व टाकरखेड्याचा दिशेने पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी व मोटरसायकल स्वारांसाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून बरेजच्या छोट्या पुलावरून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे.
दरम्यान दोंडाईचा अनरदबारी हा रस्ता बंद करण्यात आला असून गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा कुकरमुंडा-नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा नंदुरबार धुळे, गुजरातकडून धुळयाकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा प्रकाशा-नंदुरबार- धुळे, गुजरातकडून जळगांवकडे जाणारी वाहने अक्कलकुवा तळोदा शहादा -शिरपूर जळगांव वाहतूक वळविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली.

दरम्यान आज दि.18 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान या पुलावरील मोठा भाग कोसळला त्याचा व्हिडिओ दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा पुलाला भगदाड,जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश

Next Post

पोलीस प्रशासनाची बॅण्डवर बंदी, गणेश विसर्जनावर बहिष्काराचा गणेश मंडळांचा पवित्रा

Next Post
पोलीस प्रशासनाची बॅण्डवर बंदी, गणेश विसर्जनावर बहिष्काराचा गणेश मंडळांचा पवित्रा

पोलीस प्रशासनाची बॅण्डवर बंदी, गणेश विसर्जनावर बहिष्काराचा गणेश मंडळांचा पवित्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add