नंदुरबार प्रतिनिधी
शहरातील साक्री रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयापुढे आनंदी माता मंदिरा समोरील टेकडीवर बेलेश्वर महादेव मंदिरात श्रावण मासनिमित्त सुरू असलेल्या अखंड रामधूनला भाविकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
निसर्गरम्य आणि चौफेर परिसर हिरवळीने नटला असून श्रावणात अधिक खुलून दिसत आहे. उंच टेकडीवर बेलेश्वर महादेव मंदिर असून मंदिराच्या मागील सभा मंडपात साधुसंत आणि महतांच्या उपस्थितीत भाविकांतर्फे अखंड रामधून सुरू आहे.मंगळवारी भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावून प्रसादाचा लाभ घेतला.
दरम्यानअखंड राम धुन समाप्ती निमित्त शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी बारा ते तीन पर्यंत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन बेलेश्वर महादेव मंदिर शिवभक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.