नंदुरबार प्रतिनिधी
येथील जगताप वाडी परिसरातील जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी रुपेश जगताप, उपाध्यक्षपदी सुदर्शन मराठे, खजिनदार मनुराज पाटील तर सचिवपदी कल्पेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जयराजे व्यायाम शाळेची बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा होवून गणेशोत्सव समिती 2023 ची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यात होळतर्फे हवेलीचे ग्रामपंचायत सदस्य रुपेश जगताप यांची जयराजे व्यायाम शाळा गणेशोत्सव समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
तर उपाध्यक्षपदी सुदर्शन मराठे, खजिनदार मनुराज पाटील तर सचिवपदी कल्पेश पाटील तसेच सदस्य मोहनीश सोनवणे, वैभव मराठे, प्रणव पाटील, हर्षल पाटील, प्रतिक मुजगे, चेतन बोरसे, निखिल पाटील, हितेश शिरसाठ आदींची निवड करण्यात आली.








