नंदुरबार l प्रतिनिधी
येथील आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते, हे सांगण्याचा प्रयत्न गेली अनेक वर्षे जिल्हा रुग्णालय करत असून जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त जागृती, समुपदेशन आणि परिणामांची जाणीव करून दिल्यास आत्महत्या टळू शकते, असा संदेश देण्याचा प्रयत्न डॉ. साहेबराव आहिरे यांनी भामरे अकॕडमी येथे घेतलेल्या कार्यक्रमात दिला.
रोटरी क्लबचे अध्यक्ष अँड. निलेश देसाई यांनी कार्यक्रमाची प्रस्तावनाते म्हणाले की, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा करतात. ह्या दिवसाची औचित्य साधून नंदुरबार येथील रोटरी क्लब व भामरे क्लासेस यांनी विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
याप्रसंगी रोटरी क्लब सचिव कपिल अग्रवाल , सदस्य डॉ. निर्मल गुजराती , रोटरी क्लब सदस्य राहुल अग्रवाल , रोटरी क्लब मानद सदस्य डॉ. गोकुळ भदाणे , मनोज गायकवाड , बाल कल्याण समिती अध्यक्षा अँड . निता देसाई , सदस्य जागृती पाडवी , भामरे अकॕडमीचे संचालक युवराज भामरे , डॉ. ध्रुवी निलेश देसाई उपस्थित होते.
डॉ. साहेबराव आहिरे म्हणाले की, वाढलेल्या स्पर्धांमध्ये तरुण पिढीने आपल्या सुखदु:खाची नवी परिभाषा सीमित केली असून त्या परिघामधून ते थोडे जरी दुर्लक्षित झाले तर त्यांना आपले जीवन व्यर्थ वाटू लागते आणि त्यातूनच टोकाचे पाऊल उचलले जात. तसेच 2003 पासून या दिवसाची सुरुवात झाली. संसार नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले, आर्थिक संकट आले या कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही विचित्र कारणे समोर येत आहेत. यासाठी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे त्यातूनच प्रश्नांची उत्तरे हे सुटत असतात. यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो.
अँड. निता देसाई म्हणाल्या की, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक तणावाबद्दल बोलल्याने आत्महत्या टाळता येऊ शकते, हे सांगण्याचे औचित्य म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन! जगभरातील विविध उपक्रमांद्वारे आत्महत्या रोखण्यासाठी यादिवशी संदेश देण्यात येतो.
विद्यार्थ्यांमध्ये मोबाईल मुळे सायबर क्राईम चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे एखादे ॲप डाऊन झाल्यामुळे विद्यार्थी मानसिक तणावात जातात. त्याचे देखिल याचबाबत जागरूक असले पाहिजे.
डॉ. गोकुळ भदाणे यांनी जीवन कसे जगावे यावर कविता सादर करुन सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ध्रुवी निलेश देसाई यांनी केले.








