नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात कॉग्रेस पक्षा तर्फे जन संवाद यात्रा नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या नेतृत्वात काढण्यात आली.सर्व प्रथम सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी करुन अभिवादन केले. यानंतर जन संवाद याञेला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक,पं.स सभापती बबीता गावीत,उपसभापती शिवाजी गावीत, माजी पं.स सभापती रतिलाल कोकणी, पं.स सदस्य राजेश गावीत,तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,उपतालुका अध्यक्ष तुकाराम गावीत,शेतकी संघ सभापती प्रेमलाल वसावे, उपसभापती योगेश चौधरी,माजी नगराध्यक्ष दामूआण्णा बि-हाडे,डॉ.नचीकेत नाईक,दिपक वसावे,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया, उपशहर अध्यक्ष जगदीश पाटील, आर.सी.गावीत,माजी नगरसेवक आरीफ बलेसरीया,विनय, गावीत,फैजल शेख,नरेंद्र गावीत, रहमतखा पठाण,दिलीप पवार,सुभाष कुंभार,भुपेंद्र वसावे,पराग नाईक,सुरज गावीत ,धनसुख भट तालुक्यातील सरपंच,ग्रा.प सदस्य,सह तालुक्यातील कॉग्रेस पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
या प्रसंगी जन संवाद यात्रा शहरातील लाईट बाजार,लिमडावाडी,महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन याञा कुंभारवाडा,शिवाजी रोड,सराफ गल्ली,सरदार चौक या मार्गाने फिरुन याञा नवापूर तालुका कॉग्रेस भवन येथे सांगता करण्यात आली.यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की, भाजपा सरकाने देशातील जनतेची दिशाभुल केलेली आहे.सत्तेवर येण्या आधी अनेक मोठ मोठे आश्वासने दिली.शेतक-यांना त्यांच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये देऊ, पेट्रोल डिझेलचे भाव कमी करु महागाई कमी करु,देशातील आर्थिक परिस्थिती मजबुत करु असे मोठ मोठे आश्वसने पंतप्रधान मोदी यांनी दिले होते.
त्यामुळे देशातील जनता मोदीच्या भुलथापांना बळी पडुन सन २०१४ व २०१९ च्या निवडणुकी मध्ये पंतप्रधान मोदी यांना देशाची सत्ता जनतेने दिली पंरतु त्या सत्तेच्या उपयोग स्वताचा फायद्यासाठी व अडानी, आंबानी यांच्या फायद्यासाठी केला. देशा मध्ये जाती-जाती मध्ये धर्मा- धर्मा मध्ये भांडण लावुन दंगली घडुन आणल्या. त्यामुळे देशातील जनता भयभित झाली आहे.आताचे भाजप सरकार हे जनतेचे रक्षण करणारे नाही. देशाचे युवानेता राहुल गांधी यांनी भारत जोडो याञा काढुन जनतेच्या मना मध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.
समान नागरी कायदा त्याच एक उदाहरण आहे.एसी,एस टी,ओ बी सी व इतर मागस वर्ग यांना संविधानाने दिलेले अधिकार नष्ट करुन त्यांना गुलाम बनविण्याचे षडयंञ सुरु आहे.माणिपुर मध्ये जी घटना घडली त्या संबधी आज पर्यत प्रधानमंञी यांनी एक शब्द काढलेला नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दिलीप पवार यांनी केले तर आभार महाराष्ट्र राज्य आदिवासी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आर.सी.गावीत यांनी मानले.या प्रसंगी युवक कॉग्रेस तर्फे आमदार नाईक यांच्या सत्कार करण्यात आला.








