नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शहर पोलिस ठाणे येथे जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्ताने के. डी. गावीत फिजिओथेरपी कॉलेज पथराई ता.जि. नंदुरबार यांच्या विदयमाने ‘फिजिओथेरपी कॅम्प’ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे, उपअधिक्षक संजय महाजन, पोलिस निरीक्षक रविद्र कळमकर, वाहतूक पोलिस निरिक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरिक्षक नंदा पाटील, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावद या संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत, प्राचार्य डॉ. विभुती गावीत, डॉ. अक्षय बागुल, डॉ. सरस्वती पाडवी, डॉ. पुजा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळेस १६० पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी शिबीराचा लाभ घेतला. यावेळी अपर पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, दैनंदिन कामकाजात शारिरिक आरोग्याबरोबरच फिजिओथेरपीचे खुप महत्व आहे. आमच्या पोलिस यंत्रणेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना या कॅम्पचा नक्कीच फायदा होईल.
सर्वानी कॅम्पचा लाभ घ्यावा असे आवाहन केले, पुढे त्यांनी कॅम्प आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. पोलिस निरिक्षक कळमकर यांनी आपल्या मनोगतात पहिल्यांदाच होणा-या अशा कॅम्पचे स्वागत केले. असे शिबीर पोलिस कर्मचा-यांसाठी नियमित राबविले जावे अशी आशा व्यक्त केली. डॉ. विभुती गावीत यांनी शिबीर आयोजित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल यंत्रणेचे आभार मानले.








