Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गणेशोत्सवानिमित्त पोलीस दलातर्फे विविध उपक्रम,डी.जे. व डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करा : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

team by team
September 8, 2023
in राज्य
0
गणेशोत्सवानिमित्त पोलीस दलातर्फे विविध उपक्रम,डी.जे. व डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करा : पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवित एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे.डी.जे. व डॉल्बीमुक्त वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले आहे.

 

दि. 19 सप्टेंबर 2023 रोजी पासून गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. गणेशोत्सव काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेश मंडळांना मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांमध्ये मागील वर्षी गणेशोत्सव काळात डी.जे, डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करणारे, गुलाल न उधळता मिरवणूक काढणाऱ्या मंडळांचा सत्कार तसेच गणेश मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वीत करणे इत्यादी उपक्रमांचा व एक खिडकी योजना, पाणपोई इत्यादी सुविधांचा समावेश आहे.

 

गणेशोत्सव काळात गणपती मंडळांना गणेशोत्सवासाठी तात्पुरत्या स्वरुपात सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारणी करणे, तात्पुरते वीज जोडणी, नगरपालिकेशी संबंधित दुरुस्तीची कामे इत्यादी विविध प्रकारच्या परवान्यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध ठिकाणी जावे लागते, त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेवून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी गणेशोत्सव मंडळांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे ” एक खिडकी योजना ” नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे स्तरावर एक खिडकी योजनेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

 

ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित गणेशोत्सव मंडळ ज्या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना तसेच स्टेज, मंडप किंवा इतर देखावे उभारणार आहे, त्या जागेची संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पाहणी केली जाईल. पायी ये-जा करणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना त्रास होणार नाही याची खात्री केल्यानंतरच संबंधित गणेश मंडळाला परवाना दिला जाईल.

 

 

गणेशोत्सव काळात गणेश मंडळाकडून मंडप, स्टेज किंवा गणेश मंडळ स्थापन परवानगी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेवून सर्व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करुन घ्याव्यात असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.तसेच गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीची स्थापना, विसर्जन मिरवणुकीचे वेळी ध्वनी प्रदूषण निर्माण होईल अशी साधने ( डी.जे. व डॉल्बी ) यांचा वापर केल्यामुळे किंवा डी. जे. व डॉल्बी सिस्टीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे ध्वनी प्रदूषण होवून सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डी. जे. व डॉल्बीच्या उच्च आवाजामुळे वृध्द् इसम आजारी इसम, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे गणेशोत्सव व इतर सण उत्सव साजरे करतांना डी. जे. व डॉल्बी सिस्टिमचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून उत्साहात सण साजरे करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले आहे.

 

 

मागील वर्षी साजरे करण्यात आलेले सर्व धर्मीय सण, उत्सव, महापुरुषांची जयंती इत्यादी डी. जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून साजरे झाल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून जिल्हा पोलीस दलाचे व जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे.

 

त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश मूर्तीची स्थापना, विसर्जन मिरवणुकीचे वेळी गुलालाचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर प्रदूषण बरोबरच डोळे, त्वचेला इजा व इतर शारीरिक त्रास होतो. त्यामुळे गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर केल्यास प्रदूषण होणार नाही तसेच स्थापना, विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणारे किंवा मिरवणूक पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांना शारीरिक त्रास होणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त सार्वजनिक किंवा खाजगी गणेश मंडळांनी श्री गणेश मूर्तीची स्थापना,विसर्जन मिरवणुकीचे वेळी जास्तीत जास्त फुलांच्या पाकळ्यांचा वापर करावा. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विविध ठिकाणी स्वच्छ व थंड पाण्याची निःशुल्क व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 

 

तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या एक कॅमेरा पोलीसांसाठी या योजनेंतर्गत मोठ्या किंवा गर्दी होणाऱ्या गणपती मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसवावेत. तसेच जिल्ह्यात उपक्रमांतर्गत विविध चौकात, गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने यावर्षी बहुतांश गणेश मंडळे व गर्दीचे ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आली आहेत. त्यामुळे टवाळखोर तसेच छेडछाड करणाऱ्या इसमांना आळा बसणार आहे.

 

 

मागील वर्षी गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरीक वाद्यांचा वापर करणे, गुलालाचा वापर न करता फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे, गणेश स्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणाऱ्या सर्व व इतर नोंदणीकृत मंडळांचा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या आठवड्यात सत्कार करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

देवगिरी कल्याण आश्रमतर्फे जनजाती गौरव या पुस्तिकेचे प्रकाशन

Next Post

साने गुरुजी महाविद्यालयात रासेयोतर्फे महिला आरोग्य व लिंग समानता विषयावर कार्यशाळा

Next Post
साने गुरुजी महाविद्यालयात रासेयोतर्फे महिला आरोग्य व लिंग समानता विषयावर कार्यशाळा

साने गुरुजी महाविद्यालयात रासेयोतर्फे महिला आरोग्य व लिंग समानता विषयावर कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add