Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शबरी घरकुल योजनेच्या १ हजार ३१४ लाभार्थ्यांना घरकुल आदेशांचे वितरण

team by team
September 2, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शबरी घरकुल योजनेच्या १ हजार ३१४ लाभार्थ्यांना घरकुल आदेशांचे वितरण

नंदुरबार l प्रतिनिधी

 

स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशाच्या आणि राज्याच्या सर्व महत्वाकांक्षी योजनांचा पथदर्शी जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख आहे, त्याबरोबरच आता कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत नंदुरबार जिल्ह्याचा आदर्श राज्यासाठी निर्माण करू असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

 

ते आज नवापूर येथे शबरी घरकुल योजनेच्या आदेश वाटप कार्यक्रमात बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती संगिता गावित, नवापूर पं.स. सभापती बबिता वसावे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नवापूर) चंद्रकांत पवार, गटविकास अधिकारी डी. एम.देवरे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

पालकमंत्री डॉ. गावित पुढे म्हणाले, येत्या दोन वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना जिल्ह्यातील नागरिकांसाठी आहेत, त्या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांला होण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. एकही नागरिक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही देताना ते म्हणाले, स्वच्छ पाणी, चकचकीत रस्ते, स्वमालकिचे घर, दर्जेदार शिक्षण, रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारित शिक्षण, शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणतानाच प्रत्येक सामाजिक समुदायाला सर्व शासकीय योजनांचा लाभ, सोयीसुविधा देण्यासाठी सर्व पातळींवर प्रयत्न सुरू असून येणाऱ्या काळात राज्यातील विकासात आघाडीवर असलेल्या प्रथम तीन जिल्ह्यात नंदुरबार जिल्हा आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करत असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची एक लेककल्याणकारी, समृद्ध व सामर्थ्यवान राष्ट्र म्हणून प्रतिमा जगासमोर निर्माण झाली आहे,अशीच समृद्ध, सामर्थ्यवान प्रतिमा आपल्या जिल्ह्याची भविष्यात निर्माण करू, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

 

 

यावेळी १ हजार ३१४ लाभार्थ्यांना शबरी घरकुल योजनेच्या आदेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले.

 

 

दृष्टिक्षेपात शबरी घरकुल योजना

आदिवासी उपयोजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वत:ची घरे नाहीत अथवा जे अनुसूचित जमातीचे लोक कुडा-मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात, अशा अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी वैयक्तिक लाभाची शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हयासाठी एकूण १२ हजार १९४ घरकुलांचे उदिष्ट देण्यात आले होते. त्यात नंदुरबार प्रकल्पसाठी ६ हजार ६३० शबरी घरकुलांचे लक्ष प्राप्त झाले होते. ३ हजार ५८३ घरकुलांचे उदिष्ट साध्य झाले असून उर्वरित ३ हजार ४७ घरकुले पंचायत समिती नंदुरबार, नवापुर, शहादा यांचेकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांनुसार मंजूर केली जाणार आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज, नंदूरबार येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलन

Next Post

आयानचा मयत मजुर वारसांना १८ लाखाचे धनादेश वाटप

Next Post
आयानचा मयत मजुर वारसांना १८ लाखाचे धनादेश वाटप

आयानचा मयत मजुर वारसांना १८ लाखाचे धनादेश वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add