Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी

team by team
August 31, 2023
in राजकीय
0
शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा -मकरंद पाटील साहेब युवा मंचची मागणी

शहादा l प्रतिनिधी

यावर्षी अद्याप पुरेसा पाऊस झाला नसल्याने शहादा तालुका दुष्काळी जाहीर करण्यात यावा यासाठी प्रा. मकरंद पाटीलसाहेब युवा मंचच्या वतीने प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले.

मंचच्या वतीने यावर्षीची दुष्काळी परिस्थिती पहाता प्रमुख मार्गदर्शक प्रा.मकरंद पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी शेतकरी बांधवांना अडचणीच्या प्रसंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.वाढदिवसाचे औचित्य साधून मंचच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दीपक गिरासे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आमचा शहादा तालुका वसलेला आहे. तापी- गोमाईच्या पट्टयातील शहादा परिसराचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. या वर्षी जून महिन्यापासूनच परिसरात जेमतेम पाऊस झालेला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी सरासरीपेक्षा निम्मेही पर्जन्यमान नसल्याने शेत- शिवारातील पिके करपू लागली आहेत. परिसरात ऊस, कापूस, पपई, केळी, मका, मूग, सोयाबीन आदि पिके घेतली जातात. मात्र पावसाअभावी येथील शेतकरी हवालदिल झालेले आहेत.

शेतीसह जनावरांना चारा व पाणीही पुरेसे उपलब्ध होत नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी सद्यःस्थितीचा विचार करता शहादा तालुका दुष्काळी जाहीर करावा व शेतकरी बांधवांना मदतीचा हात द्यावा.निवेदन देतांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर दीपक पाटील, मोतीलाल जैन,रूपेश जैन, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विनोद जैन, माजी शिक्षण सभापती ज्ञानेश्वर चौधरी,प्रा.मकरंद पाटीलसाहेब युवा मंचचे रमाशंकर माळी,समीर जैन,ललीत छाजेड,किशन चौधरी,जयेश पाटील,सागर मराठे, कार्तिक नाईक,सागर पाटील, योगेश पाटील,शरद पाटील, अंकुर पाटील,दिलीपसिंग गिरासे, सुरेंद्र गिरासे,नरेश शिंदे, विलास पाटील, विशाल मोरे, श्रीकांत जाधव, गौरव पाटील, नितीन तिरमले, तुषार पाटील, प्रशांत पाटील,नजमोद्दीन खाटीक,भरत पाटील, घनश्याम मराठे, आनंद कोळी, अतुल सोनवणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कार्ली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पूनम पाटील बिनविरोध

Next Post

एस.ए.मिशन येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Next Post
एस.ए.मिशन येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

एस.ए.मिशन येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add