नंदुरबार l प्रतिनिधी
भारतातील आदिवासी ७५ वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वावलंबी होता परंतु आज तो परावलंबी झाला आहे. हा जल-जंगल-जमिनीचा मालक आज आपल्यावर निर्भर असल्याचे प्रस्थापित व्यवस्थेच्या निदर्शनास आल्यानंतर आदिवासींवर सातत्याने अत्याचार सुरू झाले, असे म्हणत आदिवासी सुरक्षा यात्रेचे संयोजक राजूभाई वलवाई यांनी धन-धान, वैचारिकता, संघटनात्मकदृष्ट्या आदिवासीने स्वावलंबी होण्याचे आवाहन केले.
आदिवासींवरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बिरसा मुंडांचे जन्मगाव उलीहातू (झारखंड) येथून ९ ऑगस्टला आदिवासी सुरक्षा यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत २१ जणांचा समावेश असून यात्रेचे छत्तीसगड, मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात आगमन झाले. मोलगी (ता.अक्कलकुवा) येथे यात्रेंनिमित्त आदिवासी एकता परिषदेतर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी केतन बामणीया, गिरीश बामणीया, मेहुल तावीयाड, किशोर भाभोर, सतीष दामा, हर्षल अमोकियार, असरथ पारगी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, करमसिंग पाडवी, ॲड. सरदारसिंग वसावे, बाज्या वळवी, तडवी रामा गुरुजी, आपसिंग वसावे, रामजी गुरुजी, नारसिंग वळवी, पांडुरंग सेठ, डॉ.जयदीप वळवी, माजी पोलीस पाटील रतनसिंग वसावे, माजी सरपंच अशोक वसावे आदी उपस्थित होते.
मोलगी परिसर आत्मनिर्भरतेच्या मार्गावर:-पाडवी
आदिवासी सांस्कृतिक राजधानी ठरणारा मोलगी-डाबचा परिसर संस्कृतीपाठोपाठ आदिवासी हक्क व सुरक्षेबाबतही जागृत आहे. आज मोलगीत दागिन्यांच्या व्यवसायातच आदिवासी नाही मात्र अन्य सर्वच व्यवसायात आदिवासी दिसत असल्याचे म्हणत जि.प.सदस्य सी.के.पाडवी यांनी हा परिसर संस्कृती जपत वैचारिक चळवळ व आदिवासी हक्काचा लढा उभारणारा असल्याचे सांगितले.
अक्कलकुव्यात सुरक्षा यात्रेचे अजय गावीत ॲड.रुपसिंग वसावे, ॲड.संग्राम पाडवी, ॲड.देविसिंग पाडवी, ॲड. अमरसिंग वसावे, ॲड. के.आर वसावे. ॲड.एस.एस.वसावे, ॲड.आर.पी.तडवी, ॲड.ए.आर.तडवी, कृउबाचे माजी सभापती आपसिंग वसावे, माजी उपसरपंच धिमा पाडवी यांनी स्वागत केले.