Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य कर्मचारी महासंघाचे आंदोलन स्थगित

team by team
August 31, 2023
in राज्य
0
आरोग्य कर्मचारी महासंघाचे आंदोलन स्थगित
नंदुरबार l प्रतिनिधी
दुर्गम-अतीदुर्गम भागात ७-८ वर्ष काम करूनही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी उद्या कार्यमुक्त करीत असल्याने महासंघाने आंदोलन स्थगित केले असल्याचे आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
       जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ व दुर्गम-अतिदुर्गम भागात ७ ते ८ वर्ष काम करूनही माहे मे २०२३ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदली आदेशात “भरतीने उमेदवार हजर झाल्यावर कार्यमुक्त करावे” अशी जाचक व अन्यायकारक अट टाकल्याने बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे महासंघाने ३० ऑगस्ट पासून बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
     यापार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांच्याशी यशस्वी चर्चा होऊन बदली झालेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्या कार्यमुक्त करणार असल्याचे सांगितले व आज रोजी  प्रतिनिधिक स्वरूपात एका कर्मचाऱ्याला बदलीचे आदेश दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असून आरोग्य कर्मचाऱ्यांची महत्त्वाची मागणी मंजूर झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे यांना महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी धन्यवाद दिले. चर्चेत प्रकाश नाईक, रामदास सोनार, जितेंद्र पवार,पराग जगदेव, यशोदा वळवी, देवेंद्र राठोड, प्रकाश मराठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
    आरोग्य कर्मचाऱ्यांनी अन्यायाच्या विरोधात न्यायासाठी ठाम उभे राहिल्यास निश्चितच न्याय मिळत असल्याने कोणीही अन्याय सहन करू नये असे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष वाय.पी.गिरी व सचिव सतीश जाधव यांनी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय आदिवासी सांसकृतिक महोत्सव नंदुरबार होणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

झारखंडमधून सुरुवात झालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे मोलगीत आगमन

Next Post
झारखंडमधून सुरुवात झालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे मोलगीत आगमन

झारखंडमधून सुरुवात झालेल्या आदिवासी सुरक्षा यात्रेचे मोलगीत आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add