Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्हाईस ऑफ मीडियातर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदन

team by team
August 29, 2023
in राजकीय
0
व्हाईस ऑफ मीडियातर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना दिले निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी

 

शहादा येथे व्हाईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना देण्यात आले, व्हॉईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून शासनाला आमच्या भावना कळवून मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात असे निवेदनातून मागणी करण्यात आले आहे “” पत्रकारांच्या भावना व मागण्या निश्चितच शासनापर्यंत पोहोचवणार”” असल्याचे आश्वासन तहसीलदार दीपक गिरासे यांनी व्हाईस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

 

तहसीलदार दीपक गिरासे यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा आहे की, ज्या पत्रकारांना पत्रकारितेसाठी दहा वर्षेपूर्ण झाली आहेत. अशा पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावे.

 

राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करुन, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेची पदवी पूर्णकरून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे
की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.) राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देतांना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात.

 

 

 

सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. तसा शासन निर्णय काढावा. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी.माहिती महासंचालनालय यांच्यावतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे गेल्या अनेक पुरस्कार वर्षापासून रखडले आहेत. ते देण्यात यावे.

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार करु अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडीओ आणि सोशल मिडीयात काम करणाऱ्या पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा. अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाऱ्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत. ते मार्गी लावावेत. सर्व ठिकाणी वेगाने वाढणाऱ्या आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाऱ्या सोशल मिडिया

 

 

 

 

पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मिडीयांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत. अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सुचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्या याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सुचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी.

 

 

 

सदर भावना शासनाला कळवाव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदनावर अध्यक्ष रुपेश जाधव, कार्याध्यक्ष बापू घोडराज, सचिव हर्षल सोनवणे, उपाध्यक्ष जितेंद्र गिरासे, नरेंद्र गुरव, हिरालाल रोकडे, लोटनराव धोबी, नेत्रदीपक कुवर, प्राध्यापक दत्ता वाघ, विजय निकम, राजेश्वर सामुद्रे, वृषभ अग्रवाल, विश्राम मावशी, विष्णू जोंधळे, रुपेश राजपूत, अजबसिंग गिरासे, दिलीप महिरे, रवींद्र नगराळे, दिनेश पाटील, संतोष जव्हेरी आदिचा सह्या आहेत

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार

Next Post

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

Next Post
स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add