नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सिताराम नुरला पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या आदेशान्वये व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी सिताराम नुरला पावरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. राऊ मोरे यांच्या शिफारसीनुसार सिताराम नुरला पावरा यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या हस्ते सिताराम पावरा यांना युवक जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण आदी उपस्थित होते. यापूर्वीही सिताराम पावरा हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष असतांना त्यांनी पक्ष संघटन व मजबूत करण्याचे कार्य केले. तसेच पावरा हे खडकी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. युवक जिल्हाध्यक्ष नियुक्तीबद्दल सिताराम नूरला पावरा यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.