Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींसाठी भाडेवाढ

team by team
August 18, 2023
in राज्य
0
नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींसाठी भाडेवाढ

मुंबई l प्रतिनिधी

 

केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत नागरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रांतील अंगणवाडी केंद्र इमारतींसाठी भाडेवाढ करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. ग्रामीण, आदिवासी क्षेत्रांत दोन हजार रुपये, नागरी क्षेत्रांमध्ये (नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका) सहा हजार रुपये, महानगर (Metropolitan) क्षेत्रांमध्ये आठ हजार रुपये दरमहा वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

 

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी इमारत भाडेदरामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्यात ही दरवाढ करण्यात आली आहे. अंगणवाड्यामध्ये मुलभूत सोयीसुविधांच्या वाढीसाठी भर देण्यात आला आहे. निर्धारित मासिक भाडे हे स्थानिक कर, मेंटनन्स, इतर अनुषंगिक कर तसेच वीज बिलासह निर्धारित राहतील.

 

 

ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात अंगणवाडी, मिनी अंगणवाडी इमारतींसाठी मासिक भाडे दोन हजार रूपये देता येईल.

नागरी क्षेत्रांमध्ये नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिका (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) अंगणवाडी भाडे तसेच महानगरमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर यासाठी ३०० ते ५०० चौरस फूट, २०० ते ३०० चौरस फूट आणि १८० ते २०० चौरस फूट क्षेत्रफळ अंगणवाडीकरिता निर्धारित करण्यात आले असल्याचेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

 

 

 

अंगणवाडी केंद्रासाठी इमारत भाडेतत्वावर घेताना इमारतीचा ताबा घेण्यापूर्वी इमारत योग्य व पुरेशी असल्याचे, शासनाच्या मागदर्शक सूचनांप्रमाणे मुलभूत सुविधा तपासण्यासाठी संबंधित अंगणवाडीच्या लाभार्थी पालकांची पंच समिती नेमण्यात यावी व त्यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे, अंगणवाडी केंद्राकरिता वीज सुविधा उपलब्ध असलेली इमारत भाडेतत्वावर घेणे अनिवार्य राहील. ही भाडेवाढ सन २०२३-२४ पासून लागू राहील. एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी याबाबत योग्य ती खबरदारी घेऊन याची वेळोवेळी तपासणी करावी, असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

पुढच्या पिढीसाठी ‘पाणीदार’ बना ; जलजीवन मिशन चे शिल्पकार बना : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

आता सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार

Next Post
आता सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार

आता सर्व आदिवासी वाडे,पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add