Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान

team by team
August 14, 2023
in शैक्षणिक
0
डी.आर.हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिकांचा सन्मान
नंदूरबार l प्रतिनिधी
येथील डी.आर.हायस्कूलमध्ये मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत स्वातंत्र्य सेनानी व माजी सैनिक यांचे बद्दल कृतघ्नता सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव  समारोपीय मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत  डी.आर. हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य सेनानी यांचे वारसदार व माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे  अध्यक्ष नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी  अमोल बागुल, मंदाकिनी  बागुल,  नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नरेंद्र सोनार, योजना उपशिक्षणाधिकारी  भावेश सोनवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी स्वातंत्र्य सेनानी कै.जगन्नाथ रघुनाथ असोदेकर यांचे  नातू निनाद असोदेकर,स्वातंत्र्य सेनानी कै.प्रल्हाद गणपत सोनार यांचे चिरंजीव सुनील सोनार  स्वातंत्र्य सेनानी कै.दत्तात्रय रामचंद्र उपासनी यांचे नातू पंकज पाठक व नात सून सौ.माधुरी पाठक, तसेच माजी सैनिक मुकुंद राळेगावकर, माजी सैनिक प्रवीण वसईकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर डॉ काणे गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा मोडक, डी.आर.हायस्कूलचे  उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक विपुल दिवाण,हेमंत खैरनार, माजी नगरसेवक निंबा माळी, करण चव्हाण, हिमांशू परदेशी, आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवर व विद्यार्थी यांनी  हातात माती घेवून पंचप्रण प्रतिज्ञा घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिक यांनी केलेल्या बलिदानाचे महत्त्व  सांगितले तसेच त्यांच्या वारसदार यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील केलेले आंदोलने व उपक्रमांच्या आठवणींना उजाळा दिला.   कार्यक्रम नंतर डी.आर हायस्कूलच्या  एनसीसी,खेळाडू, स्काऊटच्या विद्यार्थ्थ्यांनी रॅली  काढीत देशभक्तीपर  घोषणा दिल्या. तसेच क्रांतीवीरांच्या वेशभूषा साकारलेले विद्यार्थी यामध्ये भावेश पाटील (शिरीष कुमार) , तेजस वाडेकर (खाज्या नाईक ), आर्या वसईकर (राणी लक्ष्मीबाई), गणेश पाटील    (राजगुरू),प्रज्योत परदेशी (गांधीजी)  महात्मा फुले विराट धोडर(महात्मा फुले),सुखदेव दर्शन बंजारा (सुखदेव), आदींनी  क्रंतिविरंची वेशभूषा साकारली.
या वेळी शिरीष कुमार यांच्या  निवासस्थानी जावून सर्वांनी अभिवादन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री पंकज पाठक सर यांनी हुतात्मा शिरीष कुमार मेहता यांच्या आंदोलनाच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता साळी,प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, सत्कार व परिचय निलेश गावित, आभार दिनेश वाडेकर यांनी केले.वरील कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक,शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

इस्लामपुर येथे आमदार राजेश  पाडवी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन 

Next Post

खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

Next Post
खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

खळबळ बातमी : एटीएम मध्ये भरण्याचे एक कोटी घेऊन कर्मचारी पसार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add