नंदूरबार l प्रतिनिधी
श्री.आप्पासाो. आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके हस्ते करण्यात आले.
विद्यालयाच्या उपशिक्षीका एस.एच.गायकवाड यांनी विश्व आदिवासी दिनाची पार्श्वभूमीवर “आदिवासी या भूमीचे मुळ रहिवासी” या विषयावर माहिती दिली.अध्यक्षीय भाषणाद्वारे “बिरसा मुंडा व समकालीन आदिवासी क्रांतिकारक” या विषयावर प्रबोधन केले.विद्यार्थ्यांच्या सामुहिक आदिवासी नृत्यानंतर विखरण येथील ग्राम पंचायत परिसरातील विर एकलव्य आदिवासी युवा मंडळाच्या प्रतिमा पुजन विखरण ग्रा.पं.चे सरपंच प्रतिनिधी रोहिदास साळुंके, उपसरपंच प्रतिनिधी चंदु पवार,माजी सरपंच प्रतिनिधी बापू पाटील,माजी सरपंच केशव पाटील पोलिस पाटील ॲड.दिपमाला पाटील व ग्राम पं. सदस्य ईश्वर मराठे,धर्मा भील, वीर एकलव्य युवा मंडळाचे अध्यक्ष, विलास भील, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, खोंडामळी केंद्राचे केंद्र प्रमुख व जि.प.शाळा विखरण येथील मुख्याध्यापक जे.के.बागुल या सर्वांनी पुजन व माल्यार्पण केले.
मनिपुर येथील मॄत नागरिकांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थी सामुहिक आदिवासी नृत्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक डी.बी.भारती व आभार के.पी.देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक एम.डी. नेरकर,वाय.डी.बागुल,व्ही.बी. अहीरे,आर.एम.पाटील,एम.आर.भामरे, एस.जी.पाटील यांनी परिश्रम घेतले.









