Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गोंडगावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा द्यावी,क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानची मागणी

team by team
August 7, 2023
in राजकीय
0
गोंडगावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा द्यावी,क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

 

जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठाने केली आहे.

 

 

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार करुन हत्येचा निषेध नोंदविण्यात येत आहे. नराधमाने नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून निषेधार्थ आहे.

 

 

या निंदणीय घटनेचा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार होवून निर्घुण हत्या होत असेल तर महिला व मुलींच्या सुरक्षित नाहीत. निर्भया घटनेनंतर आतापर्यंत अनेक महिला, युवती व मुलींवर अत्याचार झाले आहेत. तसेच पिडीत मुलींसह युवतींची देखील हत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव गावात एका नऊ वर्षीय मुलीवर झालेली अत्याचार व हत्येची घटना निषेधार्थ असून असे विकृत कृत्य करणार्‍या व नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषी नराधमास त्वरीत शिक्षा व्हावी,

 

 

अशी मागणी क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण गवळी, राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय रगडे, वीर भगतसिंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष संदीप चौधरी, दिनेश माळी, रामा मराठे, पिंटर पाटील, उपेंद्र राजपूत, राजा मराठे, दीपक मराठे, आतिष मराठे, प्रशांत देवरे, भुर्‍या माळी, कृष्णाराजे प्रविण मराठे आदींनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषदेसमोर तुरवाद्य धरणे आंदोलन

Next Post

लायन्स क्लब तर्फे शिशु आहार मार्गदर्शन

Next Post
लायन्स क्लब तर्फे शिशु आहार मार्गदर्शन

लायन्स क्लब तर्फे शिशु आहार मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add