नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषदतील प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली अंतर्गत प्राथमिक शिक्षक बांधवानी दिव्यांग प्रमाणपत्र सादर करुन 400 वर दिव्यांग शिक्षकांनी इच्छीत स्थळी बदली चार लाभ घेतला तरी शिक्षक संघटनेच्या अशा निदर्शनाला की, अनेक बोगस दिव्यांग शिक्षक यांनी बदलीचा लाभ घेतला आहे तरी अशा बोगस दिव्यांग प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जे. जे.रुग्णालयात करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने केलेली असताना जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी शिक्षक संघटनेला विश्वासात न घेता परस्पर नंदुरबार जिल्हा रुग्णालयातच तपासणी करण्याचे आयोजित केले आहे.
त्यातच दुसरा मुद्दा म्हणजे 400 पैकी फक्त 142 दिव्यांगानाच तपासणीसाठी पत्र काढले तरी उर्वरित दिव्यांग प्राथमिक शिक्षकांचे काय असाही सवाल अप्रत्यक्षपणे शिक्षक संघटनेमध्ये निर्माण झाला आहे.जर एकूण 400 शिक्षकांची जर जे. जे रुग्णालयात तपासणी झाली असती तर अनेक बोगस दिव्यांग शिक्षकांच्या भांडाफोड झाला असता असा प्रहार शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांनी मत व्यक्त केला.
नंदुरबार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांना पत्रक जारी करून दि. 3 ते 8 ऑगस्ट असे सहा दिवस नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीचे नियोजन केले आहे. दोन दिवसापूर्वी शिक्षक संघटनेने निवेदन देऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळविणाऱ्या शिक्षकांची तपासणी मुंबईतील जे जे रुग्णालयात करावी अशी मागणी केली होती.
त्यावर योग्य कारवाई करण्या ऐवजी नंदुरबार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी २७ जुलै रोजी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्रक जारी करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे दिव्यांग प्राथमिक शिक्षकांची वैद्यकीय फेर तपासणीची नियोजन केले आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे निवेदन दिलेल्या असताना देखील संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कुठलीही चर्चा व विश्वासास न घेता प्राथमिक शिक्षणधिकारी यांनी परस्पर दिव्यांग यांचे प्रमाणपत्राचे तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयातच दोन दिवशी आयोजन केले आहे तरी तीन व आठ ऑगस्ट 2023 या दिवशी 142 दिव्यांग प्राथमिक शिक्षकांची तपासणी सुरू झाली असता तीन ऑगस्ट रोजी अल्पता प्रतिसाद मिळाल्याने अजून चार दिवस वाढवण्याचे निर्णय घेतला आहे तरी आठ ऑगस्टपर्यंत 100 टक्के तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर काहींनी लपवले असता अशा दिव्यांगांना जे. जे रुग्णालयात पाठवण्याचे शिक्षणाधिकारी लवकरच निर्णय घेतील असे सांगण्यात आले.
बोगस दिव्यांग प्राथमिक शिक्षकांना हा वाचवण्याच्या प्रयत्न आहे का काय हे समजायला मार्ग नाही कारण आम्ही शिक्षक संघटनेच्या मार्फत 400 दिव्यांग शिक्षकांची तपासणी जे. जे.रुग्णालयात अशा दिव्यांग शिक्षकांची तपासणी करावी अशी मागणी केली असता संबंधित शिक्षण विभाग यांनी फक्त 142 शिक्षकांची तपासणीसाठी पत्र काढले तरी बोगस दिव्यांग शिक्षकांना पाठीशी घालण्यासाठी असा निर्णय घेतला का काय जर जिल्हा परिषद आणि जिल्हा रुग्णालय यांनी विविध प्रलंबित प्रश्न बोगस दिव्यांग शिक्षक यांना वाचवले तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद येथे आंदोलन छेडण्यात येईल.
गोपाल गावित जिल्हा
अध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार








