नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा पो. पिंपळोद, ता.जि. नंदुरबार शाळेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी .एस पाटील हे होते. त्यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन विषयी आपले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले तर शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या समाज कार्या विषय माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
यावेळी शाळेची उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, हारून खा शिकलीगर , संजय बोरसे यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या लिपिक नेहा शर्मा ,शिपाई संजय वसावे, दिनेश पवार यादीने परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








