नंदुरबार l प्रतिनिधी
भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची पक्षाने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी नियुक्ती केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. लोकसभा मतदारसंघ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. त्यांच्यावर प्रदेश पातळीवरील विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.








