Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी

team by team
August 3, 2023
in राजकीय
0
गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी
नंदुरबार l  प्रतिनिधी
सरकारने माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली नवीन सुधारित अधिनियम
केले आहे.हे विधेयक विधानसभेत मंजुरीसाठी  आणले जाणार आहे. त्याच्या विरोधात बुधवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजूर युनियन तर्फे संबंधित विधेयकाची होळी करीत निदर्शने करण्यात आली.संघटनेचे अध्यक्ष अशोक रावसाहेब आरडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात फाटले आहे की, महाराष्ट्र शासनाने 1969 साली पारित केलेल्या माथाडी कायद्याची स्तुती आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केंद्र सरकारने देशभरातील काही राज्यांनी केली. त्या कायद्याचे आज महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी कायद्यात व धोरणात बदल अपेक्षित असताना सदर कायद्यात सुधारण्याच्या नावाखाली नकारात्मक बदल केलेली दिसत आहेत. सदर विधेयकास संपूर्ण विरोध असून हे विधेयक मंजूर होऊ नये यासाठी नंदुरबारसह राज्यभरातून विरोध होत आहे.माथाडी मंडळाच्या कामकाजातील स्वायत्तता लोकशाही प्रक्रिया संपुष्टात येईल.असंघटित ऐवजी अंग मेहनती शब्द टाकून कायद्याची व्याप्ती संकुचित केली आहे यंत्राच्या सहाय्याशिवाय केलेल्या कामास माथाडी कायद्याची अंमलबजावणी ठेवल्यास त्यांना संरक्षण मिळाले त्यांची संरक्षण धोक्यात येऊ शकते.
ज्या आस्थापनांनी कायद्याची अंमलबजावणी आतापर्यंत टाळली त्यांना या विधेयकामुळे अंमलबजावणी टाळण्यासाठी मार्ग उपलब्ध होईल.सल्लागार समितीची व्यवस्था काढून टाकल्याने लोकशाही व्यवस्थेला मोठा धक्का बसला असून ज्यांनी आपल्या आयुष्याची 30 ते 40 वर्ष या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी खर्ची घातली त्यांचा सहभाग शासन नाकारत आहे.प्राधिकरणाची स्थापना करून मंडळाच्या कामकाजावर अंकुश आणण्याचा प्रयत्न या विधेयकांनी होणार असून अधिकारी यांच्यामर्यादा लक्षात घेतल्या गेल्या नाहीत तसेच अनुसूचित उद्योगाच्या यादीत वाढ करण्याऐवजी ती संकुचित करण्याचा प्रयत्न या विषयातून होणार आहे.
यामुळे या विधेयकास विरोध असून चर्चे शिवाय बहुमताच्या आधारे विधानसभेत व विधान परिषदेत हे विधेयक मंजूर करू नये अन्यथा प्रदेशाध्यक्ष बाबा आढाव यांच्या आदेशान्वये  आणि मार्गदर्शनाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देण्यासाठी गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजूर युनियनचे अध्यक्ष अशोक आरडे, उपाध्यक्ष नवनाथ चौधरी, खजिनदार  बाबुलाल पाटील, सदस्य आनंदा व्हरगर, शिवाजी व्हरगर आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपणासह घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प

Next Post

सहकार चळवळीसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेणार – अँड. कालिदास पाठक

Next Post
सहकार चळवळीसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेणार – अँड. कालिदास पाठक

सहकार चळवळीसाठी लवकरच प्रशिक्षण शिबिर घेणार - अँड. कालिदास पाठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add