Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपणासह घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प

Mahesh Patil by Mahesh Patil
August 3, 2023
in Uncategorized
0
भालेर येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपणासह घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प
नंदूरबार l प्रतिनिधी
  का.वि.प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती. क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता. जि.नंदुरबार येथे वृक्षदिंडी, वृक्षारोपण व व्यसनमुक्ती अमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील,  अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  संजय महाजन, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथील सर्व अधिकारी, अंमलदार तसेच काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचालक भास्कर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  दिनेश पाटील, भालेर गावाचे सरपंच श्रीमती शोभाबाई पाटील, भालेर ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, प्रताप पाटील उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.   वृक्षदिंडी मिरवणूक व  जनजागृती   जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते वृक्ष दिंडीची पूजा आरती करण्यात आली व  वृक्षदिंडीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली श्री.पाटील यांनी वृक्षदिंडी स्वतःच्या खांद्यावर घेऊन वृक्ष दिंडीत सहभाग नोंदवला. वृक्षारोपण बाबत सामाजिक संदेश दिला सदर वृक्षदिंडी भालेर येथील श्रीमती क.पू. पाटील हायस्कूल, नागाव रोड, श्री स्वामी समर्थ केंद्र, महादेव मंदिर ग्रामपंचायत इत्यादी मार्गाने काढून ग्रामस्थांना वृक्ष लागवडीचा जनजागृती संदेश दिला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना  वृक्षतोडीचे दुष्परिणाम व लागवडीचे  आयुर्वेदिक वन औषधींचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात विद्यार्थी विविध वेशभूषांमध्ये उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण गीत, पथनाट्य, एकांकिका, भारुड , भजन, लेझीम व शिबली नृत्य  सादर केले. याप्रसंगी बोलताना  पोलीस अधीक्षक  पी.आर.पाटील  यांनी शाळेत घेतलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले. वृक्षतोड व वनांचे घटते प्रमाण व त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दल माहिती दिली. दरम्यान अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक मानसिक व सामाजिक परिणाम याचे देखील मार्गदर्शन केले. पोलीस दलाकडून राबविण्यात येणारे अमली पदार्थ मुक्त जिल्हा या अभियानांतर्गत भालेर ग्रामपंचायतीने अमली पदार्थ मुक्त ठराव मंजूर करून ठरावाची प्रत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना दिली.
यावेळी  ग्रामपंचायतीकडून भालेर गाव अमली पदार्थ मुक्त करू असे आश्वासन देण्यात आले, त्यानंतर सुगंधी तंबाखू, पान मसाला,सिगारेट आदी अमली पदार्थाची प्रतिकात्मक होळी  करून व्यसनमुक्ती, अमली पदार्थ मुक्त गाव कसे होईल असा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमासाठी भालेर,नगाव,तिसी, वडवद ,काकर्दे,निंभेल,होळ,  आक्राळे येथील ग्रामस्थ व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.सामाजिक वनीकरण विभागाकडून आलेले प्रतिनिधी वनपाल सोनाली बोरसे, वनपाल अश्विनी चव्हाण, वनपाल सविता धनगर यांची देखील उपस्थिती होती.   प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, पर्यवेक्षक अनिल कुवर ,पालक व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमात  पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघाच्या वतीने नंदुरबार तालुका अध्यक्ष ॲड.दिपमाला पाटील, वंदना गावित, राजेश पाटील, जयेश पाटील, चेतन पाटील, सुतारे, वासदरे, नगाव गावातील पोलीस पाटील यांनी सामूहिक सत्कार केला. ग्रामपंचायतर्फे सरपंच शोभाबाई पाटील, प्रल्हाद पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. पी.पाटील यांनी सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच पोलीस दलाचे कर्मचारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  परिश्रम केले.
नंदुरबार पोलीस दलातर्फे लावण्यात येणारी एक लाख रोपे नंदुरबार वनविभागाकडून उपलब्ध करून योग्य प्रकारे नियोजन व आखरी केली आहे. ही रोपे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील इतर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय तसेच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आवार शासकीय पडीक जागा व इतर ठिकाणी ७५ हजार वृक्षारोपण करून लाख वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.     
  पी. आर. पाटील
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक
बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी 12 ऑगस्टला जिल्हा संघ निवड चाचणी

Next Post

गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी

Next Post
गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी

गाडीवान हमाल मापाडी युनियनतर्फे सुधारित विधेयकाची होळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025
के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावीत सैनिकी विद्यालयात छत्रपती शाहूमहाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group