Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट

team by team
August 2, 2023
in Uncategorized
0
आ.आमश्या पाडवी यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट
नंदूरबार l प्रतिनिधी
मोलगी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे.विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.व या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नसल्याचा विश्वास कुटुंबियांना दिला.
         मोलगी येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिला जीवे ठार मारण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे.या घटनेतील दोषींवर पोलीसां कडुन योग्य ती चौकशी न करता पीडिताचा आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी कडे पोलीसांनी योग्य पद्धतीने न पाहता दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार पीडितेच्या पालकांनी आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे केली होती.
त्या अनुषंगाने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठविला होता त्यामुळे पोलीस अधिक्षक व पोलीस उप अधिक्षक यांनी मोलगी येथे भेट दिली होती व  तीन संशयितांना अटक करण्यात आली. पीडितेला व तिच्या कुटुंबियांना योग्य न्याय मिळावा यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व या घटनेतील दोषींवर जो पर्यंत पुर्ण कारवाई होत नाही तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा विश्वास दिला.
दरम्यान आमदार आमश्या पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती जाणुन घेतली तसेच ज्या ठिकाणी अल्पवयीन मुलीला मिठात ठेवण्यात आले आहे त्या ठिकाणी ही भेट दिली. आमदार आमश्या पाडवी यांनी थेट विधान परिषदेत या घटने संदर्भात आवाज उठविल्याने ग्रामस्थांमध्ये भेटीची मोठी उत्सुकता होती त्यामुळे पीडित मुलीच्या घरी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
         यावेळी युवासेनेचे तालुका प्रमुख जयवंत पाडवी, विद्या पाडवी, मोलगी शहर प्रमुख सुनील वसावे, मोलगी शाखा प्रमुख रामसिंग वसावे, काठी शाखा प्रमुख श्रावण तडवी, जामली शाखा प्रमुख अजय तडवी, वेली शाखा प्रमुख दिलवरसिंग वसावे आदीं उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वोच्च प्राधान्य : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

नंदूरबार येथे विविध संघटनांतर्फे भिडे गुरुजींचा पुतळ्याचे दहन 

Next Post
नंदूरबार येथे विविध संघटनांतर्फे भिडे गुरुजींचा पुतळ्याचे दहन 

नंदूरबार येथे विविध संघटनांतर्फे भिडे गुरुजींचा पुतळ्याचे दहन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add