नंदुरबार l प्रतिनिधी
पर्जन्यवृष्टी कमी प्रमाणात होत असल्याने नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीरचक धरणात अल्प पाणीसाठा असल्याने भविष्यात मोठ संकट उभे राहू नये यासाठी पालिकेने २ दिवसाआड पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केली आहे.
नंदुरबार शहर व परिसरात अद्याप देखील दमदार पाऊस बरसलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण अडचणीत आलेले आहेत. पाहिजे तसा पाऊस पडत नसल्याने पाण्याचे गहिरे संकट उभे ठाकत आहे. नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात देखील अल्पसाठा असल्याने भविष्यात पाण्याच्या बाबतीत मोठ संकट उभे राहू नये यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
याबाबत माजी आमदार चंद्रकांत म्हणाले, गतकाळात टंचाईचा काळात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात अल्प पाणी साठा होता त्यावेळी २ दिवसाआड पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयाचे नंदनगरीच्या जनतेने स्वागत केले होते. संपूर्ण राज्यात सर्वत्र पाणीबाणी असतांना माजी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील सभापती व नगरसेवकांच्या नियोजनातून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करणारी ही नंदुरबार नगरपालिका होती.
पाणी जपून वापरावे
शहर व परिसरात पाहिजे तशी पर्जन्यवृष्टी झालेली नाही त्यामुळे शहरातील जनतेला भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पालिका प्रशासनाने दोन दिवसात पाणीपुरवठा करावा. नागरिकांनीही पाण्याची काटकसर करून जपून वापरावे
सौ.रत्ना रघुवंशी
माजी नगराध्यक्षा








