नंदुरबार l प्रतिनिधी

शहरातील एम.के.नगर येथे अज्ञात चोरट्यांनी संधी साधून घरफोडी करत रोख रक्कमेसह सोनेचांदीचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे.याप्रकरणी उपनगर पोलीसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील एम.के.नगरमधील रहिवासी नवाब गुलाब पिंजारी हे दि.२१ ते २७ जुलै या कालावधीत घरी नसल्याने संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या तळ मजल्यावरुन कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाट फोडून त्यातून ८५ हजाराची रोकड, लाकडी पलंगात ठेवलेले ५० हजार रुपये, प्लास्टीक बॅगेतील सुमारे पाच हजार,३० हजारांची सोन्याची अंगठी, १८ हजाराचे सोन्याचे कानातील दागिने,१२ हजाराच्या दोन लहान अंगठ्या असा तब्बल दोन लाखांचा ऐवज चोरुन नेला आहे.
याबाबत नवाब पिंजारी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात उपनगर पोलीसांत भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी करत आहेत.









