Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोटरी क्लब नंदनगरीचा रविवारी पदग्रहण कार्यक्रम

team by team
July 29, 2023
in राज्य
0
रोटरी क्लब नंदनगरीचा रविवारी पदग्रहण कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर निहीर दवे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष म्हणून फखरुद्दीन जलगुणवाला तर सचिव म्हणून आकाश जैन यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे.

 

 

समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे, हिरा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ.रविंद्र चौधरी, रोटरी डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन कौन्सिलर आशिष अजमेरा, फर्स्ट लेडी वैशाली दवे, क्लस्टर सेक्रेटरी डॉ.राणू अजमेरा, युवा उद्योजक उमेश जैन, असिस्टंट गव्हर्नर चेतन सिसोदिया आदी उपस्थित राहणार आहेत.

 

सदर पदग्रहण समारंभापूर्वी रोटरी क्लब नंदनगरी तर्फे रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात अरिहंत गो शाळेत गो पूजन, वृक्षारोपण, रोटरी वाचनालयाचे उद्घाटन, रक्तदान शिबीर, प्रौढ साक्षरतेचा उपक्रम आदींच्या समावेश आहे. त्याचप्रमाणे व्हॉइस ऑफ नंदनगरी ही कराओके गितगायन स्पर्धेची अंतिम फेरी देखील शिवाजी महाराज नाट्यगृह येथे रविवारी दुपारी ११ वाजेपासून संपन्न होणार आहे.

 

 

या स्पर्धेच्या अंतिम फेरीत लहान व मोठा गट असून या स्पर्धेत एकूण ५० हौशी गायक कलावंत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील नामवंत कलाकार परीक्षण करणार आहेत. विजेत्यांना रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे विविध पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. व्हॉइस ऑफ नंदुरबार ही स्पर्धा ऐकण्यासाठी सर्वांना खुली असून या स्पर्धेवेळी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष फखरूद्दीन जलगूनवाला, सचिव आकाश जैन, अनिल शर्मा, किरण दाभाडे, प्रितीश बांगड, नागसेन पेंढारकर, शितल पटेल, सैय्यद इसरार अली, विवेक जैन, प्रवीण पाटील, राहुल पाटील, प्रा.राहुल मेघे, हर्षल पाटील, मुर्तूझा वोरा आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तीन हजारासाठी मजुराचा विहिरीत ढकलून केला खून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नंदूरबार येथे घरफोडी, दोन लाखांचा ऐवज लंपास

Next Post
नंदूरबार येथे घरफोडी,  दोन लाखांचा ऐवज लंपास

नंदूरबार येथे घरफोडी, दोन लाखांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add