नंदुरबार l
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ,नासिक यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या विविध वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे निकाल नुकतेच घोषित झाले.
यामध्ये नंदुरबार येथील ख्यातनाम पाटील हॉस्पिटल चे डॉ. राजकुमार पाटील व डॉ वृषाली पाटील यांची सुकन्या डॉ. सानिका पाटील ही लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून एम. डी. डर्मिटोलॉजी(त्वचा रोग तज्ञ),या विषयाच्या विभागात सर्वप्रथम आली.
डॉ सानिका पाटील यांचे शालेय शिक्षण श्रॉफ हायस्कूल मध्ये तर एम.बी.बी. एस.चे शिक्षण बी.जे.मेडिकल पुणे येथे घेतले आहे.या सर्व प्रवासात तिला वडील डॉ. राजकुमार पाटील आई डॉ. वृषाली पाटील यांचे सह एम. डी. चे मार्गदर्शक डॉ मिलिंद बोरकर ,नागपूर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.डॉ सानिका यांच्या यशाबद्दल वैद्यकीय वर्तुळ व समाजातून अभिनंदन होत आहे.









