Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

team by team
July 27, 2023
in राज्य
0
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण या योजनेसाठी जमीन विक्रीसाठी इच्छुक शेतकरी, जमीन मालकांनी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्‍त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

अनुसूचित जातीच्या दारिद्र्य ररेषेखालील भूमिहिन कुटुंबांना चार एकर जिरायती (कोरडवाहू) किंवा दोन एकर बागायती (ओलिताखालील) देण्याची ही योजना सामाजिक न्याय विभागातर्फे 100 टक्के अनुदानित राबविण्यात येते.

सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाला 4 एकर कोरडवाहू (जिरायत) जमीन किंमत कमाल 5 लाख प्रती एकर किंवा 2 एकर ओलीताखालील (बागायती) जमीन किंमत कमाल 8 लाख प्रती एकर जमीन उपलब्ध करुन देण्यात येते.

अपेक्षित कागदपत्रे

जमीन विक्री करणाऱ्या अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज, शेतजमीनीवर कोणताही बोजा नसल्याबाबत संबंधित तलाठी यांचे प्रमाणपत्र व 7/12 उतारा. संबंधित परिसरातील कृषी पतपुरवठा सेवा सोसायटी, व बँकचे कुठल्याही प्रकारची थकबाकी नसल्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र. शेतजमिनीचे क्षेत्रफळ बरोबर असल्याचा मोजणी विभागाचा टाचन व नकाशा, शेतजमीन खरेदी करणे बंधनकारक असणार नाही याबाबत घोषणापत्र, नुकसान भरभाई मागणार नसल्याबाबत, न्यायालयीन वाद सुरु नसल्याबाबत, जमीन गहाण नसल्याबाबत जमीन विक्री करणाऱ्या मालकाचे शपथपत्र, कुंटूंबातील दोन व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या व त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आदि आवश्यक कागदपत्र जोडून परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही सहायक आयुक्त, समाज कल्याण श्री. वसावे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आम आदमी पार्टीच्या शेतकरी आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष बिपिन पाटील यांच्या मुंबई येथे राष्ट्रवादी प्रवेश

Next Post

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार

Next Post
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानाची भरपाई वेळेत न दिल्यास संबंधितास दंड; पीडितास व्याज देणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add