म्हसावद । प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेची वृक्षदिंडी ढोल ताशांनी वाजत गाजत काढून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडी चे पूजन शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले वृक्ष दिंडी संपूर्ण शेजवा गावांतून व शिवपूर( घोड्यावद ) गावातून ढोल ताशांच्या साह्याने काढून प्रत्येक कुटुंबाने वृक्षाची लागवड करावी असा संदेश देत शाळेच्या विद्यार्थ्यांनी *एक मूल एक झाड,झाडे लावा झाडे जगवा, माकड करते हुप हुप झाडे लावू खूप खूप अशा घोषणा देत गावकऱ्यांनी व परिसरातील नागरिकांनीहि झाडे लावण्याविषयी जनजागृती केली यावेळी इ.5 वी ते इ.10वीचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.
शाळेतील काही विद्यार्थिनी , विद्यार्थ्यांनी आदिवासी पेहराव करून जनजागृती केली. कार्यक्रमाला शाळेचे क्रीडा शिक्षक विजय पवार , उपशिक्षक दीपक वळवी, रामानंद बागले, हरून खा शिकलीगर , कलाशिक्षक आनंदराव पवार, लिपिक नेहा शर्मा , शिपाई संजय वसावे, दिनेश पवार व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .शेजवा व शिवपुर गावातून वृक्षदिंडी जनजागृती करून शाळेच्या पटांगणाच्या परीसरात झाडे लावण्याचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील , शाळेचे माजी कर्मचारी सुनील चित्ते,व सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.