Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मणिपूर राज्यातील ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा,ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा.पंतप्रधानांकडे मागणी

team by team
July 26, 2023
in राजकीय
0
मणिपूर राज्यातील ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा,ट्रायबल फोरम : राष्ट्रपती राजवटही लागू करा.पंतप्रधानांकडे मागणी
म्हसावद । प्रतिनिधी
मणिपूर राज्यात दोन महिलांना भररस्त्यात नग्न करुन धिंड काढत सामुहिक बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ नराधमांना फासावर लटकवा.आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा. अशी मागणी ट्रायबल फोरमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.या संदर्भात तहसिलदार यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे.मणिपूरमध्ये जमावाने कुकी जमातीच्या दोन महीलांची भररस्त्यात नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार केल्याच्या घटनेचा ट्रायबल फोरम,ट्रायबल युथ फोरमच्या वतीने जाहीर निषेध नोंदविला आहे.
मणिपूर राज्यात ४ मे २०२३ रोजी कुकी जमातीच्या दोन  महिलांना काही नराधमांनी घेरले.त्यांनी त्या महीलांना विवस्त्र करुन त्यांची भररस्त्यात नग्न धिंड काढली.त्यानंतर त्यांना शेतात नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. मन हेलावून टाकणारी घटना घडली असून जगातील मानवतेला या घटनेने काळीमा फासला आहे.सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात असे घ्रुणास्पद क्रुत्य लांछनास्पद आहे.  संविधानाच्या अधिकाराचं जाहीरपणे उल्लंघन होत आहे.
गत मे महिण्यापासून मणिपूर राज्यात सातत्याने कुकी या आदिवासी समाजावर अनन्वित अन्याय, अत्याचार,जाळपोळ,जातीय हिंसा,सामुहिक बलात्कार होत आहे.तरी सुद्धा केंद्र सरकारने पाहणी करण्यासाठी पथके पाठवली नाहीत. वांशिक संघर्ष थांबविण्यासाठी कठोर भूमिका घेतलेली नाही.असा आरोप करण्यात आला आहे.या देशातील मूळनिवासी असलेला आदिवासी समाज आजही आपल्याच मायभूमीत सुरक्षित नसल्याचे वास्तव  चित्र अधोरेखित झाले आहे.
मणिपूर मधील राज्यसरकारने कठोर पावले न उचलल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे.त्यामुळे सरकार बरखास्त करुन तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी.यावेळी ट्रायबल फोरमचे जिल्हाध्यक्ष नितीन तडवी,ट्रायबल युथ फोरम जिल्हाध्यक्ष रणजित वसावे,ट्रायबल फोरम तालुकाध्यक्ष सिमादादा तडवी,तुषार नाईक,प्रभू तडवी,हरिश्चंद्र तडवी तानसिंग वळवी,दिपक वळवी,जिग्नेश पाडवी,जितेंद्र पाडवी विजय वळवी   आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली?
मणिपूर राज्यात मैतेई युवा संघटना, मैतेई लिपून,कांगलेईपाक कनबा लुप,अरामबाई तेंगगोल,विश्व मैतेई परिषद या संघटनांच्या ८०० ते १००० कार्यकर्त्यांना अत्याधुनिक शस्त्रे कोणी पुरविली ? याचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. आणि या संघटनांवर  बंदी आणावी.
देशात एकीकडे बेटी बचाव,बेटी पढाओ चा नारा,महिला सक्षमीकरण तर दुसरीकडे महिलांवर अत्याचार किती विसंगत परिस्थिती.  महिलांवरील घ्रुणास्पद अत्याचार सहन केल्या जाणार नाहीत. नराधमांना फासावर लटकवा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा.
– नितीन तडवी जिल्हाध्यक्ष 
ट्रायबल फोरम नंदुरबार.
बातमी शेअर करा
Previous Post

भोपाल येथे होणाऱ्या उन्मेष आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात आदिवासी कवी संतोष पावरा होणार सहभागी

Next Post

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली वृक्षदिंडी

Next Post
शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली वृक्षदिंडी

शेजवा येथील माध्यमिक विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली वृक्षदिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add