नंदूरबार l प्रतिनिधी
माध्यमिक विद्यालय खोक्राळे ता. नंदुरबार येथील विद्यार्थ्यांची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात डोळे येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून विद्यालयात त्याचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला असून उपस्थितीवर देखील परिणाम झालेला आहे.तसे मुख्याध्यापक एस. जी. सैंदाणे यांनी कोपर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भ्रमणध्वनी माहिती दिल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली यांनी तात्काळ डॉक्टरांचे वैद्यकीय पथक विद्यालयात पाठवले त्यात डॉ. श्रीकांत गोसावी व आरोग्य सेवक आर.आर.देसले यांनी मुलांच्या डोळ्यांची तपासणी करून जागेवरच औषध उपचार व आय ड्रॉप देऊन डोळ्यांचे काळजी घेण्याबाबत वैद्यकीय सल्ला दिला.
व सदरचा आजार व्हायरल असून काळजी कशाप्रकारे घ्यायची याबाबत सखोल असं मार्गदर्शन मुलांना केले व व्हायरल जास्त पसरू नये म्हणून एकमेकांच्या संपर्कात येऊ नये. डोळे आलेल्या व्यक्तीने एखाद दोन दिवस विलीनीकरण कक्षात राहावे त्याच्यामुळे हे प्रमाण कमी होऊ शकतं असे त्यांनी सांगितल.
सदर वैद्यकी तपासणी करत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली यांचे बहुमोल मार्गदर्शन व आरोग्यसेवा मिळाली सदर वैद्यकीय कामात आशा वर्कर, विद्यालयात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी कामात मदत केली. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली .