नंदुरबार l प्रतिनिधी-
मणिपूर येथे आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या समस्त आदिवासी समाजातर्फे नंदुरबार बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर बंदला भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्हा पाठिंबा व समर्थन जाहीर करत आहे.
मणिपूर येथे आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार हा मानवतेला आणि सभ्य समाजाला काळीमा फासणारा आहे सदर घटनेचा भारतीय जनता पार्टी जाहीर तीव्र निषेध करते तसेच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे आवाहन करते. असे पत्रक भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी काढले आहे.








