Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुख व स्तन कर्करोग प्रारंभीक निदान सूक्ष्म तपासणी संच वितरण

team by team
July 24, 2023
in राजकीय
0
मुख व स्तन कर्करोग प्रारंभीक निदान सूक्ष्म तपासणी संच वितरण
नंदुरबार  l प्रतिनिधी
बदलती जिवनशैली, ताणतणाव, तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत असून’ सध्या बहुतांश नागरिकांमध्ये असांसर्गिक आजाराचे प्रमाण वाढले आहेत.त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभाग विशेष योजना अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना मधून मुख व स्तन कर्करोग रुग्णांचे प्रारंभीक निदान करण्याकरिता सूक्ष्म तपासणी संच आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावीत यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात राबवण्यात आला.
 याहा मोगी सभागृह, जिल्हा परिषद नंदुरबार येथे मुख कर्करोग व स्तन कर्करोग तपासणी किट चे वितरण आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. विजयकुमार गावीत व जिल्हा परिषद अध्यक्षा  डॉ. सुप्रिया गावीत यांच्या मार्फत वितरित करण्यात आले. त्यात पहिल्या टप्प्यात नंदुरबार तालुक्यात प्रा. आ. केंद्र आष्टे, कोपर्ली, नटावद, शहादा तालुक्यात सारंगखेडा, वडाळी, कुसुमवाडा, शहाणा, तळोदा तालुक्यात, प्रतापपुर, बोरद, अक्कलकुवा तालुक्यात ब्रिटिश अंकुशविहीर, काठो, खापर, नवापुर तालुक्यात पळसून, चिंचपाडा, गताडी तसेच धडगाव तालुक्यात धनाजे, चूलवड, तलई यांना किटचे वितरण करण्यात आले.
वितरित करण्यात आलेल्या किट चा जनतेस कसा उपयोग होतो त्याचा फायदा कसा याबाबत पडताळणी करण्यात येईल. व त्यानुसार उर्वरित आरोग्य संस्थांना सदर किट चे वितरण करण्य प्रा. आ. केंद्र यांनी आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात यावे व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात यावी असे  पालकमंत्री यांनी संगितले.
अध्यक्षा यांनी संगितले की, किट प्राप्त झालेल्या सर्व प्रा. आ. केंद्रांनी आपल्या स्तरावर व उपकेंद्र स्तरावर नियमित कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करावे जास्तीत जास्त नागरिकांची शिबिरात तपासणी करण्यात यावी मुख कर्करोग व स्तन कर्करोग बाबत स्वतंत्र तपासणी अहवाल आपल्या स्तरावर ठेवण्यात यावे असे सूचित केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांनी केल.
कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार पाटील, सर्व तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी, संबंधित. प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, ए.एन.एम., उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमितकुमार पाटील यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

शिवदूतांची नेमणूक करून शासकीय योजनांच्या लाभ द्यावा; जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी

Next Post

शहिद शिरीषकुमार  मित्र मंडळातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

Next Post
शहिद शिरीषकुमार  मित्र मंडळातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

शहिद शिरीषकुमार  मित्र मंडळातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add