नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध घटकांसाठी घेतलेले निर्णय आणि शेतकरी हिताच्या राबविलेल्या योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी शिवदुतांची नेमणूक करावी असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी केले.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात रविवारी सकाळी बैठक घेण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले,‘शासन आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांसह छोटे-मोठे उद्योग, व्यवसायासाठी देखील सरकार विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करून मदत करत आहे. याचा लाभ सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, यासह अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे.
बैठकील शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, नवापूर तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष बकाराम गावित, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गावित, विसरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच आशिष अग्रवाल, दीपक सैंदाणे, ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित, मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष जिल्हाप्रमुख निलेश हिरे,नवापूर विधानसभा प्रमुख गणेश पोद्दार, तारापूर सरपंच गिरीश वसावे, नगारे सरपंच आनंद नाईक, उपसरपंच अनिल वसावे, कामोद सरपंच काशीराम गावित,
वडकळंबी सरपंच जितू गावित, करंजवेल सरपंच इल्पेश वसावे, वऱ्हाडीपाडा सरपंच दलपत वसावे, उपसरपंच सुंदर वळवी, वागदी उपसरपंच राजू गावित, लहान कडवान उपसरपंच मनीष गावित, केलपाडा शाखाप्रमुख आबिद गावित, बोरविहीर अबिदन गावित, रायपूर सदस्य राहुल गावित, खांडबारा शहर प्रमुख शैलेंद्रसिंह चव्हाण, शहर प्रमुख चंद्रशेखर सैंदाणे, गटप्रमुख अनिल चौधरी, युवा शहर प्रमुख अरविंद वसावे, देवळीपाडा गटप्रमुख विक्रम गावित, चितवी गटप्रमुख दिनेश गावित, दापूर गटप्रमुख प्रकाश गावित, वडसत्रा गटप्रमुख काशीराम गावित, केळी गटप्रमुख दिलवरसिंग गावित, डोगेगाव गटप्रमुख सुधाकर वळवी, कल्पेश वळवी, उमेश वळवी, आबीद शेख, विसरवाडी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिवदूत व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजना दूत ॲपच्या माध्यमातून लाभ मिळवून द्या
शिवसैनिकांनी योजना योजना दुत ॲप डाउनलोड करून जास्तीत जास्त लोकांना शासकीय योजनांच्या लाभ मिळवून द्यावा.शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा संरक्षण शासन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी का होईना दिलासा मिळणार आहे. असे जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी सांगितले.








