Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत : प्राचार्य पी. एस. जैन

team by team
July 22, 2023
in शैक्षणिक
0
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी  संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावेत : प्राचार्य पी. एस. जैन
नंदुरबार l प्रतिनिधी
 औद्योगिक  प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया  12 जून-2023 पासुन सुरु करण्यांत आलेली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन  नवापूर औद्योगिक  प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. एस. जैन यांनी केले आहे.
दहावी उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण इच्छुक विदयार्थ्यांनी / विदयार्थीनींनी Admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून 11 जूलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. संस्थेत तयार करण्यांत आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतींची माहिती पुस्तिका डिजिटल स्वरुपात वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यांत आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला अर्ज निश्चित करावा. व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत संस्थेत समुपदेशन करण्यांत येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध अभ्यासक्रमांची माहिती देण्यांत येते.
औ.प्. संस्था, नवापूर (जि.नंदुरबार)मध्ये एकुण 13 व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध असून 312 एवढ्या  जागा प्रवेशासाठी या उपलब्ध आहेत. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औ.प्र. संस्थांचे आधुनिकीकरण करण्यांत येत आहे. आय.टी.आय.प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यांत येणऱ्या विदयावेतन / निर्वाह भत्ता वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यांत आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यांत आलेली आहे. दहावी अनुतीर्ण विदयार्थ्यांना आय.टी.आय. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार दहावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यांत येते, तर दहावी उत्तीर्ण विदयार्थ्यांना आय टी आय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार इ. 12 वी समकक्षता प्रदान करण्यांत येते, तरी दहावी उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण विदयार्थ्यांना आवाहन करण्यांत येते की, आय.टी.आय.तून व्यवसायीक शिक्षण पूर्ण करुन त्वरीत रोजगार,स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी  प्रवेश घ्यावा असेही नवापूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य पी.एस. जैन यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

डिजिटल इंडिया सप्ताहाचे २५ ते ३१ जुलै दरम्यान आयोजन -सुधीर खांदे

Next Post

मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post
मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

मतदारांनी घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add