नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नंदूरबार जिल्हाध्यक्षपदी डॉ. अभिजित दिलीपराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजित दिलीपराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्ती पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
त्यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण पक्षाच्या वाढीसाठी व पक्षाची ध्येय धोरणे सर्व सर्वसामन्यापर्यंत पोहचविण्यासाठी पक्षाला आपले सहकार्य राहील असा मला विश्वास आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.








