Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाबार्डच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या प्रगतीपथावर : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
July 16, 2023
in राज्य
0
नाबार्डच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या प्रगतीपथावर :  जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

नाबार्डने जिल्ह्यात अनेक पथदर्शी प्रकल्प उभारले आहेत. म्हणून नाबार्डच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा विकासाच्याा प्रगतीपथावर आहे.असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले

कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात मंगळवारी नाबार्डच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजन करण्यातले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मणिषा खत्री यांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि कृषी देवता भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद पाटील यांनी प्रस्तावना केली.पाटील यांनी जिल्ह्यातील नाबार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी , जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सचिन गांगुर्डे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रीसे, पशुसंवर्धन तज्ञ डॉ. महेश अनापुरे,आरसीटीचे संचालक गणेश पठारे, कृषी विज्ञान केंद्राची वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य व रेशीम उत्पादनामधील संधी याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले.

याच कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच हैदराबाद येथील तृणधान्य शास्त्रज्ञ आशिष बिडकर व पुणे येथील महेश लोंढे यांचे ऑनलाइन चर्चासत्र झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले.या एकदिवशीय कार्यशाळेत डॉ. हेडगेवार सेवा समिती, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, रुलर फाउंडेशन, टाटा लेणी, बायफ, मावीम, आणि युवा मित्र या संस्थांसह शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात उत्पन्न मर्यादेत वाढ

Next Post

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संगीता सोनवणे

Next Post
एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संगीता सोनवणे

एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदी संगीता सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add