Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संत नामदेव महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- मा.आ.शिरीष चौधरी

team by team
July 16, 2023
in राजकीय
0
संत नामदेव महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- मा.आ.शिरीष चौधरी
नंदुरबार l प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराजांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला सुसंस्कृत करण्याचे काम केले. संत नामदेव महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असे प्रतिपादन  मा.आ.शिरीष चौधरी यांनी केले.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी “पायरीचा दगड” होण्याची श्री. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी  धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.
नंदुरबार  शहरातील  श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळातर्फे आज  दिनांक 15 जुलै 2023 वार शनिवारी  संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 673 व्या संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न झाला. ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार  शिरीष  चौधरी ,  मध्यवर्ती संस्थाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष भुकनशेठ सावळे , माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, शिंपी समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा शहराध्यक्ष सोमनाथ  शिंपी ,  उपाध्यक्ष शैलेश  शिंपी ,  महिला जिल्हाध्यक्ष सरिता भामरे ,  महिला शहराध्यक्ष संगीता शिंपी ,  जिल्हा युवकाध्यक्ष अजय देवरे आदी उपस्थित होते . मान्यवरांच्या  हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेची पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी दीपश्री ( दुर्वा )  प्रसन्न शिंपी हीची पांडुरंगाची वेशभूषा घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
याप्रसंगी  माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले की , संत शिरोमणी नामदेव महाराजांनी प्रत्येक समाजातील व्यक्तीला सुसंस्कृत करण्याचे काम केले. आपण मुलांना उच्चशिक्षित करत असताना सुसंस्कृत देखील केले पाहिजे तसेच आजकाल मुलं मोबाईलच्या आधीन होत आहे. पालक मुलांच्या हातात मोबाईल देऊन मोठी चूक करत आहे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायला पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन शिरीष चौधरी यांनी केले ,ते पुढे म्हणाले की मी जरी अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार असलो तरी देखील शिंपी समाज हा आपला समाज आहे .नंदुरबार शहरातील शिंपी समाजासाठी भविष्यात 30-35 लाखाचा  निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन.शिंपी समाज व चौधरी समाज ह्या नांण्याचा दोन बाजू आहेत. आपण नेहमी एकमेकांच्या  सुखदुःखात उभे राहत असतो. असे देखील माजी आमदार शिरीष चौधरी यांनी बोलतांना सांगितले.
श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा आज तैलिक मंगल कार्यालय नंदुरबार येथे  मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या  पालखीचे पुजन व आरती  माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या  हस्ते करण्यात आले. त्यानंतर पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली तैलिक मंगळ कार्यालयापासून , गणपती मंदिर तेथून विठ्ठलाच्या दर्शनाला नामदेवांची पालखी विठ्ठल मंदिरात दाखल झाली.  समाज बांधवांनी विठ्ठलाच्या नाम गजर करत तेथून परत पालखी तैलिक मंगल कार्यालयात आणून तेथे  महाप्रसादाचा समाजबांधवांनी  लाभ घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष  सोमनाथ  शिंपी , उपाध्यक्ष शैलेश शिंपी , माजी नगरसेवक  गजेंद्र शिंपी , प्रदिप शिंपी , दिनेश पवार ,  अनिल  जाधव ,   विजय  देवरे , मोहन भामरे , योगेश सुरेश खैरनार ,  वैभव करवंदकर , विवेकानंद खैरनार , प्रशांत बिरारी , राजेंद्र जगताप ,  सुनील पवार, हितेश अहिरे,  डॉ. कमलेश खैरनार , प्रसाद कापुरे , प्रवीण सोनवणे , भावेश बागुल,  भटू जाधव , विनोद सोनवणे , हितेंद्र सोनवणे ,   प्रसन्न शिंपी  तथा नंदुरबार शहर शिंपी समाज युवक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

अवैध मद्यासह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त, चालक व मालक फरार

Next Post

ऊसतोड कामगारांना मिळणार ग्रामपंचायतीमर्फत ओळखपत्र : देविदास नांदगावकर

Next Post
ऊसतोड कामगारांना मिळणार ग्रामपंचायतीमर्फत ओळखपत्र : देविदास नांदगावकर

ऊसतोड कामगारांना मिळणार ग्रामपंचायतीमर्फत ओळखपत्र : देविदास नांदगावकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add