Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जवाहर नवोदय विद्यालयायाच्या सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

team by team
July 11, 2023
in शैक्षणिक
0
जवाहर नवोदय विद्यालयायाच्या सहावीत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे

नंदुरबार l प्रतिनिधी

 जवाहर नवोदय विद्यालय, श्रावणी येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2024 साठी 10 ऑगस्ट, 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय श्रावणीचे प्राचार्य पी. आर. कोसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.  प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व नंदुरबार तालुक्यातील शासनमान्य शाळेतील इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेला (2023-24) असावा. विद्यार्थ्यांचा जन्म 01 मे 2012 पूर्वी व 30 जुलै 2014 नंतर झालेला नसावा.  विद्यार्थी हा 2021-22 ते 2023-24 मध्ये इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी उत्तीर्ण असावा.
अनुसूचित जाती, जमाती आणि सर्व मुली, अपंग संवर्गासाठी व इतर मागास वर्गासाठी जागा राखीव आहेत, तसेच तृतीयपंथीय उमेदवारही निवड चाचणीसाठी अर्ज करु शकतील. निवड चाचणी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन प्रक्रियेतून सोपी केली असून परिक्षेसाठी डेक्सटॉप, लॅपटॉप, मोबाईल, टॅब याद्वारे नवोदय विद्यालय समितीच्या https://navodaya.gov.in/nvs/en/Home1 किंवा https://cbseitms.nic.in/ ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जासाठी आधार कार्ड, मुख्याध्यापकाचे पत्र, रहिवासी दाखला, फोटो, स्वाक्षरी आवश्यक आहे.
  प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार 20 जानेवारी 2024 रोजी घेण्यात येणार असून अर्ज भरण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2023 आहे.    यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत. अधिक माहितीसाठी, एस.एन. जाधव मोबाईल क्र. 9404814281 विनोद पाटील मोबाईल क्र. 8830745576 यांच्याशी संपर्क साधावा असेही मुख्याध्यापक श्री. कोसे यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

फिरत्या विधी सेवा केंद्र व लोक अदालत वाहनाचा शुभारंभ

Next Post

नंदूरबार पोलीस दलातर्फे अवैध मद्यासह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Next Post
नंदूरबार पोलीस दलातर्फे  अवैध मद्यासह 46  लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

नंदूरबार पोलीस दलातर्फे अवैध मद्यासह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add