Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

साधू महाराजांचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या, सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

team by team
July 9, 2023
in क्राईम
0
साधू महाराजांचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ठोकल्या बेड्या, सव्वा पाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

नंदूरबार l प्रतिनिधी

 

 

साधू महाराजांचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून 5 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दि.7 जुलै 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नंदुरबार शहरातील बस स्थानक ते भाजीपाला मार्केट परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या इको कंपनी गाडी (क्र.GJ-07-DD-5109) वाहनातील 2 ते 3 बहुरुपी साधू महाराज हे लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने परिसरात फिरत आहेत.

 

 

सदरची माहिती पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना कळवून एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ संशयीतांना ताब्यात घेवून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

 

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील बस स्थानक, भाजी मार्केट, डी.एस.के. मार्केट व परिसरात शोध घेतला असता महाराणा प्रताप पुतळयाजवळ 2 ते 3 साधू महाराज संशयीतरित्या उभे असल्याचे दिसून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या जवळ जावून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता ते आम्हास सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देवू लागले. तसेच ते खरोखरचे साधू महाराज नसल्याचा संशय आला,

 

 

म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्या ताब्यातील वाहनाची झडती घेतली असता वाहनात बहुरूपी साधू महाराज बनण्यासाठीचे साहित्य मिळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुभानाथ शेतानाथ मदारी रा. स्टेशन रोड, हलोल, जि.पंचमहल (गोध्रा),, धिरूनाथ सरकारनाथ मदारी रा. तय्यबपूरा कपडगंज, जि. खेडा, विक्रम कालू परमार, वय-25, रा. कतवारा, ता. जि. दाहोद (गुजरात) असे यांना अटक केली. तसेच त्यांनी ते बहुरूपी साधू महाराजांचा वेषांतर करुन त्यांच्याकडील खोटे रुद्राक्ष लोकांना दाखवून त्यांना बोलण्यात गुंतवून लोकांकडून पैसे, सोने, चांदीचे दागिने व इतर वस्तू हातचलाखीने घेवून त्यांची फसवणूक करण्याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनात 111 खोटे रुद्राक्ष, चंदनाचा लेप असलेली डबी, विविध प्रकारच्या रंगाचे खडे, रुद्राक्ष माळ, साधू महाराज बनण्यासाठी लागणारे कपडे, कापूर, मोबाईल, रोख रुपये व एक चारचाकी वाहन असा एकुण 5 लाख 24 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत इसमांच्या पध्द्तीप्रमाणे नंदुरबार जिल्हा घटकात काही गुन्हे दाखल आहे किंवा कसे ? याबाबत अधिकची पडताळणी केली असता, दि. 29 मार्च 2022 रोजी फिर्यादी दत्तात्रय कृष्णराव येवले, रा. स्वामी समर्थ नगर, कोरीट रोड, नंदुरबार यांची नमूद वर्णनाच्या बहिरूप साधू महाराज यांनी हातचलाखी करून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांची 45 हजार रुपये किंमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या संगनमताने फसणूक करून चोरून नेल्या होत्या. त्यावरून दि.30 मार्च 2022 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीतांविरूध्द गुन्हा दाखल असल्याचे समजून आले म्हणून ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही संशयीत इसमांना नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आलेले आहे.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सुनिल मोरे, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अंमलदार अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेश येलवे, पोलीस नाईक बलविंद्र ईशी, स्वप्नील पगारे, पोलीस अंमलदार अनिल बडे, प्रवीण वसावे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सावधान: हतनुर धरणाच्या पाणी पातळीत वाढ; तापी काठावरच्या गावातील नागरिकांना सतर्कतेसाठी आवाहन

Next Post

वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Next Post
वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

वीर जवान मनोज माळी यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add