नंदूरबार l प्रतिनिधी

येथील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सायन्स ओलंपियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल मॅथ्स ओलंपियाड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या उत्तम शिक्षणासाठी व सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवत असते याची जाण ठेवून हायस्कूलमध्ये मागील काही वर्षांपासून सायन्स, मॅथ्स, इंग्लिश इत्यादी विषयांच्या ओलंपियाड परीक्षा सुरू करण्यात आले आहेत या परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे ज्ञान,आकलन,तर्क क्षमता व बौद्धिक विकास होत असतो. यावर्षी गणित विषयाच्या परीक्षेत एकूण १७५ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यात २२ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले अथर्व माळी,संस्कृती माळी, हेमंत चौधरी यांनी पाचवीतुन सुवर्णपदक प्राप्त केले. ललित बडगुजर, शुभम निर्मल,तन्वी गोसावी ,तनुष्का आव्हाड यांनी सहावीतून सुवर्णपदक प्राप्त
केले. हिमांशू पाटील ,पियुष शाह, रुचिता मुजगे, अथर्व पाटील,राम पाटील यांनी सातवीतून सुवर्णपदक प्राप्त केले. स्नेहल पाटील,कल्याणी बागुल, हेमश्री पाटील यांनी इयत्ता आठवीतून सुवर्णपदक प्राप्त केले. सुयोग बोरसे,साई महाले,मंथन पाटील सुवर्णपदक काबीज केले भूमी गोल्हाईत,गार्गी पाटील सुधांशू पाटील,यांनी दहावीतून आपले सुवर्णपदक संपादित केले.
सदर परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. परीक्षेत विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक किशोर रौंदळ, सुरेखा दाणेज, सुनील राणा,प्रतिभा साळुंखे, हर्षिता पाटील,मनीषा कलाल यांचे मार्गदर्शन लाभले.









