Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रवादीच्या फुटीचा नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणावर असा परिणाम, वाचा कोणाचा कोणाला पाठींबा

team by team
July 5, 2023
in राजकीय
0
राष्ट्रवादीच्या फुटीचा नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणावर  असा परिणाम,   वाचा कोणाचा कोणाला पाठींबा

नंदुरबार l प्रतिनिधी


राज्यात शिवसेनेत फूट पडून भाजपा सोबत शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. आता राष्ट्रवादीचेही दोन गट झाल्याने नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी मात्र अजित पवार यांच्या गटाला पाठींबा दिला आहे. अजित पवार यांच्याशी कौटूंबिक व जिव्हाळ्याचे संबंध तसेच त्यांच्या काम करण्याच्या शैलीवर विश्वास असल्याने आपण अजित पवारांसोबत असल्याचे डॉ.मोरे यांनी सांगितले.तर तळोदा येथील मा.आ.उदेसिंग पाडवी व पदाधिकारी मुंबई येथे शरदचंद्र पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिले.

 

 


खा. शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा केला आहे. यामुळे शिवसेनेेप्रमाणेच नेमकी राष्ट्रवादी कोणाची? आता असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी अजित पवार यांच्या गटाला पाठींबा दिला आहे. याबाबत डॉ.मोरे म्हणाले की, राजकारणात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष पद तसेच आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद देण्यासाठी अजित पवार आग्रही होते. तसेच आपण सामान्य कार्यकर्ते असलो तरी नंदुरबारला आले असतांना आवर्जुन अजित पवार विचारपूस करतात,

 

घरी भेट देतात यामुळे साहजिकच आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ना.पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात आले. यामुळे पूर्ण ताकदिनिशी अजित दादांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तळोदा शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष वगळता जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रवादीचे पदाधिकारी, विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, सदस्यांनी अजित पवार यांना पाठींबा दिला आहे.


दरम्यान मुंबई येथे शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आज बैठक बोलावली होती.यावेळी आ.एकनाथ खडसे उपस्थित होते.यावेळी तळोदा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.आमदार उदेसिं पाडवी यांनी एकनाथ खडसे यांचा सत्कार करीत तळोदा येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी शरदचंद्र पवार यांच्या सोबत असल्याचे दर्शविले.

 

 

यावेळी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील,तळोदा कृ.उ.बा.स.उपसभापती हितेंद्र क्षत्रिय,तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत,शहर अध्यक्ष योगेश मराठे, राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदीप परदेशी,शहादा-तळोदा विधानसभा अध्यक्ष कुणाल पाडवी,मा.नगरसेवक चंद्रकांत पाटील,युवा आधारवड फाऊंडेशन उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजरत्न बिरारे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

Next Post

अखेर तो वादग्रस्त फलक मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविला

Next Post
अखेर तो वादग्रस्त फलक मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविला

अखेर तो वादग्रस्त फलक मोठ्या पोलीस बंदोबस्तात हटविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add